पाचोरा : वाहतूक पोलिसांची चिकन टिक्क्या गाडी मालकावर कारवाई !

पाचोरा : वाहतूक पोलिसांची चिकन टिक्क्या गाडी मालकावर कारवाई
पाचोरा शहरातील जारगाव चौफुलीवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी चिकन टिक्क्याची हातगाडी लावल्याने गाडीमालकावर पाचोरा पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.
दिनांक 02 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास पाचोरा शहरात जारगाव चौफुली खडकदेवळा रोडवर सार्वजनिक जागी पाचोरा पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस पवनकुमार पाटील, सुनील पाटील, संदीप भोई यांनी वाहतुक नियंत्रण करीत असताना त्यांना एका व्यक्तीने त्याची चिकन टिक्क्या विक्रीची हातगाडी रस्त्याच्या मध्यभागी उभी केली असल्याचे आढळून आले. हातगाडी रस्त्याच्या मध्यभागी उभी केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच, हातगाडीमुळे वाहनचालक आणि चालकांकडे लक्ष न दिल्याने अपघाताची शक्यता होती.
या प्रकरणी वाहतूक पोलीस पवनकुमार पाटील यांच्या फिर्यादीवरून संबंधित व्यक्तीविरुद्ध भादवि कलम 283 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस हवालदार सुनील पाटील हे करीत आहेत.
वाहतूक पोलिसांनी वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी वाहने किंवा हातगाड्या उभ्या करू नयेत असे आवाहन केले आहे.



