खान्देश

शिवसेना नेत्या  वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते कु.कृष्णा ठाकरे यांचा सत्कार…!

शिवसेना नेत्या  वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते कु.कृष्णा ठाकरे यांचा सत्कार…!
पाचोरा- पुणे येथील शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे संपन्न झालेल्या 17 वर्षाखालील राज्यस्तरीय आर्टिस्टिक्स जिम्नॅस्टिक्स सांघिक स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून कु. कृष्णा ठाकरे याने जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.त्याच्या या दैदीप्यमान कामगिरीबद्दल शिवसेनेच्या धडाडीच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.कु. कृष्णा ठाकरे हा निर्मल जिम्नॅस्टिक्स क्लबचा खेळाडू आहे.सातत्यपूर्ण सराव आणि  गणेश मोरे यांच्या अनमोल मार्गदर्शनाने त्याने उत्तुंग भरारी घेतली आहे.
निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात श्रद्धेय तात्यासाहेबांच्या प्रेरणास्थळाजवळ कुमार कृष्णाचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य  गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे, समन्वयक स्नेहल पाटील, मार्गदर्शक गणेश मोरे आदी उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button