विवाहितेस जातीवाचक शिवीगाळ, 40 दिवसानंतर अखेर 6 जणांवर अट्रॉसिटी गुन्हा दाखल

विवाहितेस जातीवाचक शिवीगाळ, 40 दिवसानंतर अखेर 6 जणांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल
एरंडोल (वृत्तसेवा) – एरंडोल तालुक्यातील कासोदा जवळील उत्राण गु.ह. गावात दोन गटात उफाळलेल्या वादातून एरंडोल पंचायत समितीचे माजी उपसभापती संशयित अनिल महाजन यांच्यासह इतर 5 संशयितांवर 40 दिवसानंतर ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे एरंडोल तालुक्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
घटना:
उत्राण गु.ह. गावातील 30 वर्षीय आदिवासी समाजाच्या ग्रामपंचायत सदस्या पीडित विवाहितेने सहा जणांनी माझ्या घरासमोर येऊन जातीवाचक शिवीगाळ केली माझ्या चारित्र्याबद्दल बरे वाईट बोलल्याने मला घराबाहेर निघण्यास देखील लाज वाटत असल्याबाबत तक्रारी फिर्याद कासोदा पोलीस स्टेशन येथे दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, मी सन 2021 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्यानंतर आम्ही अपक्ष सदस्यांनी ठरविल्या प्रमाणे सुरवातीचे अडीच वर्ष श्रीमती वाघ यांना सरपंच पदासाठी व नंतरचे अडीच वर्ष मला सरपंच पदासाठी ठराव झाल्या नंतर सुद्धा श्रीमती वाघ यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर परत सरपंच पदासाठी अर्ज सादर करुन पुन्हा निवडून आल्याने गावातील लोकांनी त्यांना व परिवर्तन पॅनल मधिल 4 व अपक्ष 3 अश्या सदस्यांना तुम्ही गद्दारी केली तुम्ही शब्दाला टिकले नाहीत व तुम्ही थुंकुन चाटले असे बोलण्याचे संशयित 6 जणांना जिव्हारी लागले.
दि. 25 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 06.30 वाजेच्या सुमारास मी व माझे पति घरी असतांना गावातीलच अनिल महाजन, योगेश महाजन, दिनेश सोनवणे, चंद्रकांत वाघ, हरेष पांडे, शरद वाघ सर्व रा. उत्राण गु.ह. ता. एरंडोल हे घराच्या बाहेर उभे राहुन मला पावरिन रांड घराच्या बाहेर निघ तु गाव चालवणारी पावरिन रांड आहे का ? हलक्या जातीची तुझी लायकी आहे का सत्ता चालविण्याची ? ग्रामपंचायतीची सत्ता पावरनिच्या हातात देवु का? मी भिल्ल पावरा जातीची असुन अनुसुचीत जमातीची आहे हे त्यांना माहित असुन सुद्धा मला वर नमुद इसमांनी जातीवाचक शिवीगाळ केली. त्यांच्या अश्या शिवीगाळमुळे मला घरातून बाहेर निघण्यास लाज वाटत आहे.
कायदेशीर कारवाई:
पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून कासोदा पोलिसात एरंडोल पंचायत समितीचे संशयित माजी उपसभापती अनिल महाजन यांच्यासह इतर 5 संशयित आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेचा पुढील तपास Dysp अभयसिंग देशमुख हे करीत आहेत.



