cmegp मुळे बेरोजगार तरुणांना मोठी संधी; आता स्वतः बनू शकतात उद्योजक

बेरोजगार तरुणांना मोठी संधी; आता स्वतः बनू शकतात उद्योजक
Employment News : राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील युवक, युवतींची वाढती संख्या व उद्योग/व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या रोजगार (Employment) व स्वंयरोजगार नवीन संधी विचारात घेवून उद्योजकांना चालना देणारी सर्वसमावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (Cmegp scheme) या नावाने महत्वकांक्षी योजना सन २०१९-२० पासून राज्यात जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळ या कार्यालयांमार्फत राबविण्यात येत आहे.
या (Cmegp scheme) योजनेचा लाभ घेण्यासाठी या आहेत आवश्यक पात्रता
- ही योजना मार्गदर्शक सुचनेनुसार पात्र उत्पादन व सेवेच्या उद्योग व्यवसायासाठी आहे.या योजनेत कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण व 45 वर्षापर्यंतचे (अनुसूचित जाती/जमाती/महिला/इतर मागासवर्ग/अपंग/माजी सैनिक/ विमुक्त व भटक्या जमाती/अल्पसंख्याक यांच्यासाठी 5 वर्ष शिथिल) पात्र राहतील.
या योजनेसाठी शैक्षणिक पात्रता ही 10 लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पासाठी 7 वी उत्तीर्ण व 25 लाखावरील प्रकल्पासाठी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तसेच अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानावर आधारीत (Employment) स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा. (कोणत्याही योजनेत अनुदान घेतलेले नसावे)
या योजनेच्या (Cmegp scheme) माध्यमातून या व्यवसायांना मिळेल अनुदान !
या योजनेत (Employment) उत्पादन व्यवसायासाठी (उदा. बेकरी उत्पादन, पशुखाद्य निर्मिती, फॅब्रिकेशन) ५० लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पासाठी अर्ज करता येईल. व सेवा उद्योग व्यवसायासाठी (उदा. सलुन/रिपेअरींग व्यवसाय, ब्यूटी पार्लर इ.) २० लाख रुपयांपर्यंत अर्ज करता येईल. या योजनेत अनुसूचित जाती/जमाती/महिला/ इतर मागासवर्ग/अपंग/माजी सैनिक या प्रवर्गातील अर्जदार शहरी भागासाठी बँकेने मंजुर केलेल्या प्रकल्प किमतीच्या २५ टक्के अनुदान व ग्रामीण भागासाठी ३५ टक्के अनुदानासाठी पात्र असेल. त्यासाठी त्यांना स्वगुंतवणूक ५ टक्के करावी लागेल. उर्वरीत सर्व प्रवर्गातील अर्जदार (Employment) हा शहरी भागासाठी १५ टक्के व ग्रामीण भागासाठी ३५ टक्के अनुदानासाठी पात्र असेल. या लाभार्थीना १० टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल.
या योजनेसाठी (Cmegp scheme) असा करा अर्ज.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने (Employment) http://maha-cmegp.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज करतांना अर्जदारास स्वतःचा फोटो, आधार कार्ड, (रहिवास दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/जन्मदाखला), मार्कशीट, पॅनकार्ड, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला वेबसाईटवरुन वरुन डाउनलोड करुन पुर्ण भरलेले हमीपात्र (Undertaking form) ही कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
जिल्ह्यातील ज्या सुशिक्षित बेरोजगार (Employment) युवक-युवतींना नविन उद्योग/व्यवसाय सुरु करावयाचा आहे त्यांनी वरील वेबसाईटवर अर्ज करावा. किंवा योजनेबाबत (Cmegp scheme) सविस्तर माहिती घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र/खादी ग्रामोद्योग मंडळ, शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजसमोर, जळगाव येथे कार्यालयीन कामाचे दिवशी प्रत्यक्ष भेट द्यावी. तसेच ही योजना राबविण्यासाठी या कार्यालयाकडून कोणत्याही खाजगी व्यक्तीची नेमणूक केलेली नाही. या योजनेचा लाभ घेतांना लाभार्थ्याची खाजगी व्यक्तीकडून फसवणूक झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही.असेही कार्यालाकडून सांगण्यात आले आहे . त्यामुळे एजंट पासून सावधान . व कोणताही आर्थिक व्यवहार करू नका .
जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र अर्जदारांनी या (Employment) योजनेचा (Cmegp scheme)
लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर परिपूर्ण आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव दुरध्वनी क्र. 0257/2252832 वर अथवा didicjalgaon@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


