अन्यखान्देश

घातक टर्मिन ड्रग इंजेक्शनची सर्रास विक्री थांबवावी – उबाठा युवासेना

घातक टर्मिन ड्रग इंजेक्शनची सर्रास विक्री थांबवावी – उबाठा युवासेना.

प्रतिनिधी: सतिष नामदेव पवार

संपर्क. ९५२७७९९३०४

०६ धुळे ग्रामीण (धुळे):-धुळे शहरात सर्रासपणे टर्मिन नामे ड्रग इंजेक्शनची विक्री सुरू आहे, या इंजेक्शनची गरज फक्त ऑपरेशन करतेवेळी असते, तरीही सर्वसाधारण मेडीकल स्टोअर्सवर सदर इंजेक्शन मिळत असून अनेक मेडीकल स्टोअर्सला डॉक्टर्सच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय वाढीव दराने इंजेक्शन विक्री सर्रासपणे सुरू आहे, यामुळे हृदय विकाराचा झटका येणे, नैराश्य येणे, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणे असे अनेक दुष्परिणाम युवकांमध्ये दिसून येत आहेत.तरी

या इंजेक्शनचा वापर कुस्तीगीर, खेळाडू व अनेक क्रीडा क्षेत्रातील तरुण करीत आहेत.सध्या कुस्ती तसेच सर्वच स्पर्धा सुरू असून या विषयाकडे गांभीर्याने अन्न व औषध प्रशासन मंडळाने लक्ष दिले पाहिजे व अशा संशयित मेडीकल व जिम्सवर धडक भेटी देऊन कारवाई केली पाहिजे असे निवेदन युवासेना धुळे महानगरप्रमुख मनोज जाधव यांनी अन्न व औषध प्रशासनचे प्रभारी अधिकारी देशमुख यांना देण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख हरिष माळी, युवतीसेना जिल्हा अधिकारी सोनी सोनार, उपजिल्हाप्रमुख कुणाल कानकटे, मनोज जाधव, सिद्धार्थ करनकाळ, सिद्धेश नाशिककर, जयेश सोनवणे, सुमित चौधरी, आदी युवासेना पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button