
नरभक्षक बिबट्याला जेरबंद करा किंवा ठार मारा ! आ.कुणाल पाटील यांच्या भेटीनंतर वनमंत्र्यांचे आदेश.
प्रतिनिधी: – सतिष नामदेव पवार (संपर्क – ९५२७७९९३०४)
०६ धुळे ग्रामीण (धुळे):- धुळे तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालकांच्या वारसांना तातडीने २५ लाख रुपये द्यावेत तसेच त्या नरभक्षक बिबट्याला तत्काळ जेरबंद अथवा बेशुध्द करावे आणि शक्य न झाल्यास ठार करावे असे आदेश राज्याचे वनमंत्री ना.सुधीर मुनगनटीवार यांनी मुख्य वन्य जीव रक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक श्री महिपत गुप्ता यांना आज दिले. बिबट्याचा बंदोबस्त व्हावा आणि वारसांना आर्थिक मदत मिळावी म्हणून आज आ.कुणाल यांनी वनमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर सदर आदेश धुळे उपवनसंरक्षक यांना दिले.दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची रेस्क्यू टीम सज्ज करण्यात आली असल्याची माहिती आ.पाटील यांनी दिली आहे.गेल्या काही दिवसापासून धुळे तालुक्यातील बोरी पट्टयात बिबट्याने धुडगूस घातला आहे. या नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत २ जणांचा बळी घेतला आहे. तर एका बालकाला गंभीर जखमी केले आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी आ.कुणाल पाटील यांनी आज दि.२६ ऑक्टोंबर रोजी सायं.४ वाजता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. आणि त्यांना धुळे तालुक्यातील सर्व परिस्थिती लक्षात आणून दिली. यावेळी मंत्री ना.मुनगंटीवार यांनी बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकार्यांना यावेळी दिले.यावेळी आ.कुणाल पाटील यांनी मंत्री दालनातून नागपूर येथील राज्याचे मुख्य वन्य जीव रक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक श्री महिपत गुप्ता यांच्याशी चर्चा केली.त्यावेळी त्यांनी बिबट्याला बेशुध्द करण्याचे आणि तसे शक्य न झाल्यास ठार मारण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले.दरम्यान बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करुन वारसांना तातडीने २५ लक्ष रुपये मदत द्यावी अशा सूचना ना.मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.तसेच पुणे येथील वनविभागाचे व एनजीओचे पथक या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पाचारण करण्यात आले असून लवकरच या बिबट्यांना जेरबंद करण्यात यश येईल अशी खात्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी आ.कुणाल पाटील यांना दिली.
वनविभागाची रेस्क्यू टीम सज्ज करण्यात आली असून धुळे,जळगाव,नासिक आणि पुणे येथील वनविभागाची पथके या रेस्क्यू टीममध्ये सहभागी झाले आहेत. रात्रीच्यावेळी कॅमेरा ट्रॅप लावून हालचाली टीपण्याचा उपाय योग्य ठरतो. बिबट्याचे आवडते खाद्य श्वान देखील पिंजर्यात सावज म्हणून ठेवण्याचा प्रयोग केला जाणार आहे.बोरी पट्टयात अनेक ठिकाणी पिंजरे व कॅमेरे ट्रॅप लावण्यात आले आहेत.अशी माहिती धुळे उपवनसंरक्षक अनिलकुमारसिंग यांनी आ.कुणाल पाटील आणि मंत्री ना.मुनगंटीवार यांना दिली.



