एरंडोल आडगाव येथील 40 वर्षीय मुख्याध्यापक बेपत्ता !

एरंडोल आडगाव येथील 40 वर्षीय मुख्याध्यापक बेपत्ता !
पाचोरा (प्रतिनिधी)- पाचोरा तालुक्यातील शाळेत कार्यरत असलेले मुख्याध्यापक, मुळगाव आडगाव येथील तर सध्या स्थितीत पाचोरा शहरातील भास्कर नगर येथील रहिवासी महेंद्र तागड हे अचानक बेपत्ता झाले आहेत. पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील विद्याप्रबोधनी प्राथमिक विद्यामंदीर या शाळेतील मुख्याध्यापक महेंद्र धर्मा तागड वय 40 हे दिनांक 30 ऑक्टोंबर 2023 रोजी शालेय कामकाजा निमित्त पुणे येथे जाऊन येतो असे सांगून गेले मात्र ते घरी परतलेच नाहीत, शाळेत, परिसरात नातेवाईकांकडे व इतरत्र शोध घेतला असता मिळून देखील आले नाही म्हणून त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी मिसिंग दाखल करण्यात आलेली असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे, सदर व्यक्ती कुठे दिसून आल्यास व आढळल्यास पाचोरा पोलीस स्टेशन अथवा त्यांचे बंधू जितेंद्र तागड 📞8805203557 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.



