जळगांव जिल्हा

संजय गांधी निराधार योजना अनुदानासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दक्षता अध्यक्षा योजना पाटील सह सदस्यांचे साकडे.!

संजय गांधी निराधार योजना अनुदानासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दक्षता अध्यक्षा योजना पाटील सह सदस्यांचे साकडे.!
भडगांव- (प्रतिनिधी)-( संजय शेवाळे) : शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत दिले जाणारे अनुदान लाभार्थ्यांना गेल्या चार महिन्यापासून मिळाले नाही. सदर योजनेतील निराधरांवर उपासमारीची वेळ आली आहे. श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, विधवा, परित्यक्त्या महिला, दिव्यांग आदि योजनेचे लाभार्थी सतत चौकशी करीत आहेत. दिवाळी सणापुर्वी मागील तिन महीने व ऑक्टोबर महिन्यासह चार महिन्याचे अनुदान सुधारित 5 जुलै 2023 च्या जी. आर. नुसार पाचशे रुपये वाढ असे रू. पंधराशे प्रमाणे तात्काळ अदा करावेत. अशी मागणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माजी अध्यक्षा तथा महिला दक्षता समिती अध्यक्षा योजना पाटील, उपाध्यक्षा मिना बाग, सदस्या सुशिला पाटील, सदस्या नूतन पाटील आदि महिला प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदनद्वारे केली. दरम्यान भडगांव नायब तहसीलदार रमेश देवकर व राजेंद्र अहिरे यांना दिलेल्या निवेदनाची माहितीही दिली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लवकरच याबाबत पूर्तता केली जाईल असे समिती अध्यक्षा योजना पाटील, उपाध्यक्षा मिना बाग, सदस्या सुशिला पाटील, सदस्या नूतन पाटील सह आदि सदस्यांना आश्वस्त केले आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button