खडकदेवळा बु.|| येथे ६६ वां धम्म चक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा !!

खडकदेवळा बु.|| येथे ६६ वां धम्म चक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा
पाचोरा, दि. १७ ऑक्टोबर २०२३ : पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथे ६६ वां धम्म चक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे प्रगतिशील शेतकरी धर्मराज सूर्यवंशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून भगवान देवरे, संभाजी देवरे, वाचनालयाचे संजय निकम, विश्वास पाटील, देवचंद गायकवाड, हे होते.
यावेळी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व विशद करताना डॉ. यशवंत पाटील यांनी सांगितले की, हा दिवस भारतात साजरा केला जाणारा महत्त्वाचा उत्सव आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पाच लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला तेव्हापासून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो.
या कार्यक्रमात प्रास्ताविक विश्वास पाटील, सूत्रसंचालन संजय निकम तर आभारप्रदर्शन डॉ. यशवंत पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रसाद खराटे, आदित्य सूर्यवंशी, बापू देवरे, चत्रू पाटील, अरुण निकम, अनिल देवरे, नाना देवरे, नंदू पाटील, आबा देवरे, नाना सिताराम, तसेच वाचनालयाचे व फाउंडेशनचे पदाधिकारी, ग्रामस्थ, युवावर्ग इत्यादींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमात बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण केले आणि त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला.



