राष्ट्रीय

: अखेर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाचा राखला मान!

: अखेर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाचा राखला मान!

जालना (NZI वृत्तसेवा )-::- जालना येथे सुरु असलेले उपोषण 14 सप्टेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण सोडले आहे. उपोषणाच्या 17 व्या दिवशी जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटीत येऊन जरांगे पटील यांच्याशी 15 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर जरांगे पाटील यांना ज्यूस पाजला आणि त्यांचं उपोषण सोडलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास ठेव. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना दिलं. त्यामुळे जरांगे पाटील यांनीही जास्त आढेवेढे न घेता उपोषण मागे घेतलं. त्यानंतर जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री म्हणून तोंडभरून कौतुक केलं.एकनाथ शिंदे यांच्या सोबत गिरीश महाजन , रावसाहेब दानवे , सानिपान भुमरेसह शिष्टमंडळ उपस्थित होते .

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button