कृषी

पाचोरा तालुक्यातील सार्वे बु येथे बिबट्याने तोडले गाईचे लचके !

पाचोरा तालुक्यातील सार्वे बु येथे बिबट्याने तोडले गाईचे लचके !

पाचोरा (प्रतिनिधी) – आज 15 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास बिबट्याने पाचोरा तालुक्यातील सार्वे बुद्रुक येथील शेतकरी राजेंद्र पंडित पाटील यांच्या नदी थडीजवळील गोठ्यातील बांधलेल्या गाईवर हल्ला चढवत तिचे लचके तोडून तिला ठार केले, या हल्यात शेतकऱ्याचे सुमारे 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झालेले असून , वन कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनेस्थळी पाहणी करत पंचनामा केला असून नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकरी राजेंद्र पाटील यांनी मागणी केली आहे, तर या परिसरामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून या बिबट्याचा वावर असून परिसरातील डुकरे, कुत्रे यांच्यावर हल्ले चढविणे त्यांना ठार करून त्यांचे खाद्य खाणे असा उपद्रव या बिबट्याचा सुरूच असून शेतकऱ्यांना शेत शिवारात जाण्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . त्यामुळे आतातरी वन अधिकाऱ्यांनी ठोस पावले उचलून या हिंस्त्र बिबट्यापासून शेतशिवाराची सुटका करण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच शेतक-यांना या संकटापासून दूर करावे अशी मागणी गावक-यांनतर्फे जोर धरत आहे .

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button