जळगांव जिल्हा

3 सप्टे येथे कुऱ्हाड खु येथे अण्णासाहेब देशमुख फाउंडेशन व मेडिलिव्ह हॉस्पिटल नाशिक तर्फे महाआरोग्य शिबिर

3 सप्टे येथे कुऱ्हाड खु येथे अण्णासाहेब देशमुख फाउंडेशन व मेडिलिव्ह हॉस्पिटल नाशिक तर्फे महाआरोग्य शिबिर

 

पाचोरा – तालुक्यातील कु-हाड खुर्द येथील अण्णासाहेब देशमुख फाऊंडेशन व डाॅ.शरद देशमुख यांचे मेडिलिव्ह मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल( द्वारका,नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने कुऱ्हाड खुर्द येथे आदर्श माध्यमिक विद्यालय येथे रविवार 3 सप्टेंबरला महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .

या शिबिरात अनेक तज्ञ डॉक्टर्स -डॉ.अनुज नेहेते (मेंदू विकार), डॉ. स्वप्नील विधाते (नेत्ररोग व मोतीबिंदू),डॉ. राहुल गहिलोद (अस्थिरोग), डॉ. पार्थ देवगावकर (किडनी विकार ),डॉ. दिपीका मुंदडा (एम.डी.), डाॅ.अंकुर झंवर ( हृदयरोग), डाॅ.विजय जाधव ( बालरोग), डॉ.निखिल पाटील (एम. डी), नीलेश पवार (बालरोग), डॉ. शरद देशमुख (पोटविकार व यकृत),डाॅ.सुरज चौधरी (संधिवात),डॉ. महेंद्र बोरसे ,(बालरोग),डॉ. सुचिता देशमुख (स्त्रीरोग तज्ञ), डॉ मुकेश चौधरी (कॅन्सर तज्ञ ), डॉ सिद्धांत तेली (एम डी), डॉ.शीतल सावनेरकर (त्वचारोग),डॉ. ज्योत्स्ना पाटील (दंतरोग), रेवती पुजारी (आहार तज्ञ ) रुग्णांची विनामूल्य तपासणी करणार आहेत. ईसीजी,बीएमडी,लिव्हर फायब्रोस्कॅन,बीएमआय ,ब्लड प्रेशर,डायबेटीक न्यूरोपॅथी स्क्रीनिंग,शुगर ,लिव्हर फंक्शन टेस्ट,युरिक ॲसिड,हिपॅटायटिस बी व सी तपासणी , हिमोग्लोबीन आदी तपासण्याही मोफत करण्यात येणार आहे.

गरजू रुग्णांनी नांव नोंदणीसाठी

८०८०८८३०७४ /९८८१४१४१३९

किंवा ०२५३-२५०६५९९ या नंबर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिरास कु-हाड ग्रामपंचायत विकास सोसायटी व आदर्श हायस्कूल, स्थानिक डॉक्टर्स , कृष्णा लॅब तसेच कुऱ्हाड ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभणार असल्याची माहीती यकृत विकार तज्ञ डाॅ.शरद देशमुख आणि स्त्रीरोग तज्ञ डाॅ. सुचिता देशमुख यांनी दिली.

या शिबीरात गरजू रुग्ण वैद्यकीय सेवेपासून वंचित राहू नये व रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून महत्वपुर्ण महागड्या चाचण्याचे शिबीर पंचक्रोशित प्रथमच होत आहे गरजु रुग्णांसाठी ही सुवर्णसंधी असून त्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पोट व लिव्हर तज्ञ डॉ. शरद देशमुख यांनी केले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button