आमडदे येथे आझादी का अमृत महोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा !

आमडदे येथे आझादी का अमृत महोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा !
पाचोरा (प्रतिनिधी) – आमडदे गावात पत्रकार कै.नरेंद्र भोसले बहुउद्देशीय स़ंस्थेतर्फ दरवर्षी फौजी जवानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते.सालाबादप्रमाणे झेंडा वंदन नंतर पत्रकार नरेंद्र भोसले संस्थेचे अध्यक्ष तथा माजी उपसभापती पंचायत समिती संभाजी भोसलेा यांनी या अमृत महोत्सव वर्षापासून नवी संकल्पना हाती घेतली,गावातील जे जे फौजी जवान,पोलीस बांधव,होमगार्ड या पैकी पंधरा आगस्ट ला जे जे जवान योगायोगाने गावात हजर असतील अशा सर्वांचा त्यांच्या माता पिता कडूनच एक रोप व शाल श्री फळ देऊन सत्कार करण्यात येईल.
या वर्षी गावात हजर असलेले मेजर किरण पाटील,जवान- आण्णा पाटील,बंटी पाटील,सागर पाटील,रोशन पाटील,सुधीर पाटील, अशोक पाटील,पोलीस बांधव बापु भोसले,सागर पाटील, जितू पाटील या सर्वांचा त्यांच्याच माता पितां कडून निंब या झाडाचे रोपे देऊन सत्कार करण्यात आला.निंबांचे झाड ऑक्सिजन देणारे असते आपल्या आईवडिलांनी दिलेले रोप रोपन करून त्याचे संगोपन करणे हि जबाबदारी व आठवण प्रत्येक जवानास राहील व प्रेरणा देईल.
प्रसंगी या कार्यक्रमात शिक्षक,विद्यार्थी,,सरपंच,ग्रामसेवक,तलाठी,आरोग्य सेवक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षी पंधरा आगस्ट रोजी हा उपक्रम राबविला जाईल असे संस्था अध्यक्ष संभाजी भोसले यांनी सांगितले.



