खान्देश

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सु. भा .पाटील प्रा.विद्या मंदिर पाचोरा येथे आज दि.१५-८-२०२३ अर्थातच स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा.

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सु. भा .पाटील प्रा.विद्या मंदिर पाचोरा येथे आज दि.१५-८-२०२३ अर्थातच स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा.

पाचोरा ( प्रतिनिधी )  पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सु. भा .पाटील प्रा.विद्या मंदिर पाचोरा येथे आज दि.१५-८-२०२३ अर्थातच स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी शालेय समितीचे चेअरमन जगदीश सोनार यांच्या हस्ते (मुख्य बिल्डिंग) येथे ध्वजरोहण करण्यात आले. तर (भडगाव रोड विभागात)तनिष्का गटाच्या अध्यक्ष ज्योती संजय वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अशोक परदेशी ,बालवाडीच्या मुख्यध्यापिका पवार , तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महिला मंडळ कार्यकारिणी अध्यक्ष ती शमा राम शर्मा ,उपाध्यक्ष  प्रीती परिकर उपाध्यक्ष महेश्वरी दुष्यांत रावल ,सुरेखा पाटील इ…तसेच मुन्नी सीमा जान, आयेशा सीमा जान आणि शांती सीमा जान आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग ,पालक वर्ग इ.मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी राष्ट्रगीत,ध्वजगीत,राज्यगीत विविध घोषणा या सर्वांनी शाळेचे वातावरण देशभक्तीमय होऊन गेले होते.
स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून वाघ डेअरी फर्म चे अश्विन वाघ आणि दर्शन फॅशन सेंटर यांचे तर्फे शाळेच्या उपशिक्षका श्रीमती रुपाली उल्हास पाटील मॅडम आणि महाले यांच्या प्रयत्नातून यांनी गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले. या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या देशाप्रती असलेल्या भावना त्यांच्या भाषणातून तसेच देशभक्ती पर गीतातून व्यक्त केल्या .या वेळी विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी आणि पालकांनी खुप खुप कौतुक केले.यावेळी भडगाव रोड विभागात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.
या स्वातंत्र दिनाच्या प्रसंगी सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला .तो म्हणजे आमच्याच शाळेतील महेश लोखंडे सरांच्या कृतीतून साकारलेला मोटु- पतलू चा सेल्फी पॉईंट या ठिकाणी आकर्षक रांगोळ्या तिरंगी फुगे झाडांच्या कुंड्या  इ..च्या साहाय्याने सुशोभीकरण करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट,बिस्किटे व इतर खाऊचे वाटप करण्यात आले .या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले….
या प्रसंगी टिपलेले काही क्षणचित्रे

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button