खडकदेवळा गावातील रस्ते दुरुस्तीची नागरिकांची मागणी !

खडकदेवळा गावातील रस्ते दुरुस्तीची नागरिकांची मागणी !
पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खू येथील गावातील रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसामुळे मोठे मोठे खड्डे होऊन त्यात पाणी साचल्याने शाळकरी मुले व वयोवृद्धांना चालणे मुश्कील झाले आहे . मात्र तरीही ग्रामपंचायत सदस्य व सरपंच याकडे दुर्लक्ष करताना दिसत असून झोपेचे सोंग घेत आहे. रस्त्यांची दुरुस्ती करायची असल्यास तुम्ही अर्ज द्या मग आम्ही काम करू अशी भाषा वापरात आहेत सदर रस्ता हा जीव घेना ठरलेला असून सदर रस्त्याने महिला वर्गाला तर मोठी कसरत करावी लागत आहे.काही वेळा तर अनेक महिला खड्यात पडून त्यांच्या हातातील दळण , भाजीपाला , वा गरजेच्या वस्तू खड्यात पडल्याने मोठे आर्थिक नुकसान देखील होत आहे . तरीदेखील ग्रामपंचायात लोकांच्या समस्या कडे दुर्लक्ष करीत आहे, यामुळे गावातील रस्त्यावर पावसाळ्याच्या पाण्याचे सांडपाणी जमा होऊन सदर पाण्यावर डास मच्छर बसून आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे . तसेच शेतातील मजुरांना देखील सदर रस्त्याने वापरणे व वाहन चालकांना सदर संकटांचा सामना कराव लागत आहे . लहानांपासून ते मोठ्यान पर्यंत सर्वानाच याचा त्रास होत आहे . रस्त्याचे काम व्हावे अशी गावक-र्यांची मागणी होत आहे .



