उबाठा सेनेच्या मेळाव्यात शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार तर अनेकांचा उबाठा मध्ये प्रवेश !

सदर मेळ्याव्यात मोठ्या संख्येने तरुणांनी जाहीर प्रवेश केला नविन कार्यकरणी जाहिर करत नुतन पदाधिकाऱ्यांना सौ.वैशालीताई सुर्यवंशी व मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्रकांचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी,
जिल्हा संपर्क प्रमुख संजय सांवत, जिल्हाप्रमुख हर्षल माने, जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा संघटक गजानन महालपूरे, पाचोरा विधानसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील, जिल्हा प्रमुख दिपक राजपूत, उद्धव मराठे, शेतकरी सेनेचे अरुण पाटील,रमेशजी बाफना,अॅड. पाटील,शरद पाटील, शहर प्रमुख अनिल सावंत, दादाभाऊ चौधरी, पप्पु राजपुत, संदिप जैन,भरत खंडेलवाल,अॅड प्रविण पाटील, गणेश परदेशी, यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
पाचोरा (प्रतिनिधी )- मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्ते यांना शेतकरी सेनेचे अरुण पाटील यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असतांना कपाशीला १२ हजार रुपयांचा भाव होता. आताचा मुख्यमंत्री घरोघरी फिरत आहे तरी कपाशी, सुर्यफुल, सोयाबीन, इत्यादी पिकांना योग्य भाव नाही, सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या असतील तर फक्त शिंदे सरकार आल्यावर कारण शेती मालास योग्य भावच नाही हे खोके सरकार आहे,आणी ते म्हणतात अचीड वर्ष उद्धव ठाकरे साहेब घरात बसले म्हणतात,असे ते म्हणाले.
मेळ्याव्यात प्रसंगी मोठ्या संख्येने उबठा गटात तरुणांनी जाहीर प्रवेश केला नविन कार्यकरणी जाहिर करत नुतन पदाधिकाऱ्यांना वैशालीताई सुर्यवंशी व मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्रकांचे वाटप करण्यात आले.
मेळाव्याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी,जिल्हा संपर्क प्रमुख संजय सांवत, जिल्हाप्रमुख हर्षल माने, जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा संघटक गजानन महालपूरे, पाचोरा विधानसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील, जिल्हा प्रमुख दिपक राजपूत, उद्धव मराठे, शेतकरी सेनेचे अरुण पाटील,रमेशजी बाफना,अॅड.अभय पाटील,शरद पाटील, शहर प्रमुख अनिल सावंत, दादाभाऊ चौधरी, पप्पु राजपुत, संदिप जैन,भरत खंडेलवाल,अॅड प्रविण पाटील, गणेश परदेशी, यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
प्रसंगी शिवसेना नेत्या वैशालीताई यांनी मार्गदर्शन करतांना आपल्या भाषणात म्हणाले उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी गावांगावात नागरीकांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण फक्त फोटो काढण्यासाठी साठी काम करायचे नाही. तर
,गांव तिंथ शाखा गांव तिथे शिवसेना सैनिक झाले पाहिजे फेसबुक व्हॉट्सॲप वर स्टेट्स ठेवून काही उपयोग नसून , कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आमचा वर अन्याय तर झालाच पण मुंबई येथून मंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला याचा अर्थ कि यांना शिवसेनेने घाम फोडला होता, येणाऱ्या काळात उध्दव ठाकरे साहेबांचे हात बळकट करा, माझ्या बद्दल चुकीच्या अफवा पसरवण्यात येते, की आमची सेंटीग झाली आहे पण मी तात्याची मुलगी आहे कुठलीही सेटिंग करणार नाही. सध्या पाचोऱ्यात असं सुरू आहे. मी तुम्हाला कामे देतो आमच्या कडे या असे प्रभोलन देण्याचे काम चालु आहे,मला तात्यांनी जे संस्कार दिले आहेत ते मी विसरणार नाही, लोकप्रतिनिधीं लोकांचा हितासाठी बोलावे शेतकऱ्यांचा हितासाठी बोलावे अश्या फालतु गोष्टी वर बोलू नये. गिरणा नदी वर सात बलुन बंधारे बांधण्यात येणार होते. त्याच काय झाले त्यावर ते बोलत नाही, पाचोरा ग्रामीण रुग्णालयात गेल्यावर रोगराई घेवून घरी येवू अशी अस्वच्छता व घाणीच साम्राज्य झाले आहे. यांचाकडे आमदाराचे लक्ष नाही. तरुणाचा बेरोजगार बाबत तुम्ही कधी बोलत नाही एम.आय. डी. सी. कधी होणार,नुसत्या गप्पा मारण्यात काहीच अर्थ नाही आपणास संघटन मजबुत करावी लागणार आहे.संर्घष करावा लागणार आहे तरच उबाठा चा झेंडा फडकेल.आपल्या भाषणात आमदारांचा चागलाच सामार घेतला . तसेच जिल्हा संपर्क प्रमुख संजय सांवत यांनी मार्गदर्शन करत आमदारांवर टिका केली,ते म्हणाले जो नाही झाला काका चा तो काय होणार मतदारांचा, ठेकेदारांना पदे दिली कामे दिली कारण टक्केवारी मिळते म्हणून माझे कुटूंब मोठे झाले पाहिजे मी श्रीमंत झालो पाहिजे , बाकी जनता गेली खड्ड्यात.एक इंच जागा विकणार नाही असे म्हणणारे यांनी शेतकरी संघाची जागा कशी विकली.अश्या प्रकारची टिका त्यांनी यावेळी केली.
सदर मेळाव्यास मोठ्या संख्येने पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



