
पेंडगाव येथे पार पडलेल्या राज्य कुस्ती स्पर्धेत पाचोराच्या महिला मल्लांचे यश**
पाचोरा (प्रतिनिधी) भडगाव तालुक्यातील पेंडगाव येथे नुकत्याच **महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद** यांच्या वतीने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत **महाराष्ट्र केसरी कुस्ती** अंतर्गत झालेल्या महिला गटातील कुस्तीत पाचोरा तालुक्याच्या दोन महिला मल्लांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
५० किलो वजनी गटात **धनश्री पाटील (रा. तारखेडा)** तसेच ६० किलो वजनी गटात **शर्वरी कुलकर्णी (रा. पाचोरा)** यांनी प्रथम क्रमांक पटकावत **महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी थेट निवड** मिळवली आहे. या दोन्ही खेळाडू **महावीर व्यायाम शाळा, पाचोरा** येथील महिला मल्ल असून त्यांना कुस्तीचे धडे देणारे वस्ताद **दिनेश पाटील** यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशिक्षक कैलास आम्ले , एस. के. पाटील , निलेश कुलकर्णी तसेच महावीर व्यायाम शाळेचे अध्यक्ष राजेंद्र सुकदेव पाटील यांनी दोन्ही महिला मल्लांचे अभिनंदन केले असून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
पाचोरा तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात या यशामुळे नवचैतन्य निर्माण झाले असून महिला कुस्तीपटूंनी केलेली ही कामगिरी प्रेरणादायी ठरत आहे.



