सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ला NABH मानांकन

रुग्णांच्या जीवनवृध्दीचे विश्वासपात्र दालन असलेल्या सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ला NABH मानांकन
पाचोरा (प्रतिनिधी)- सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ला NABH मानांकन NABH ही संघटना देशातील सर्वोच्च स्तरावर आरोग्य आणि आरोग्य सेवांवर सुधारणेसाठी लक्ष ठेवून असते व ज्या हॉस्पिटल मध्ये आरोग्य विषयक सेवा देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता असते त्यांना मानांकन दिलें जाते.
जगातील आरोग्यविषयक जे मानदंड आहेत त्यांचे पालन करण्याचे महत्वाचे कार्य हे NABH मार्फत केले जाते. NABH हे सर्व कार्य करत असताना आरोग्य सेवा गरजेच्या असणाऱ्या रुग्णांचा आणि सेवेच्या गुणवत्तेचा विचार करत असते.
हॉस्पिटलमध्ये मध्ये उत्तम दर्जाच्या आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्या सेवा असतील तरच हॉस्पिटल ला NABH मानांकन भेटते.
सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ला NABH मानांकन भेटल्याबद्दल हॉस्पिटल चे संचालक डॉ स्वप्निल दादा पाटील व डॉ ग्रिष्मा पाटील यांचे अभिनंदन.
सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा येथे नुकतीच राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना ( MJPJAY) व केंद्र सरकारची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ( PMJAY) सुरु झालेली आहे.



