पोलीस कर्मचारी योगेश पाटील यांच्या सतर्कतेमुळे 85 वर्षे वयाचे बाबा यांना त्यांच्या मुलाच्या दिले ताब्यात!

पोलीस कर्मचारी योगेश पाटील यांच्या सतर्कतेमुळे 85 वर्षे वयाचे बाबा यांना त्यांच्या मुलाच्या दिले ताब्यात!
( पाचोरा प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा जवळील बाळद येथील रहिवासी पंडित दोधा सोमवंशी वय 85 काही दहा वाजता कुठलेही कारण न सांगता करून निघून गेले होते. घरच्यांनी त्यांचा शोध चालू केला सर्वत्र पाहिले असता ते कुठेच आढळून आले नाही पण इकडे बाबा पाचोरा शहरात येऊन त्यांनी रंगारी गल्लीतील विठ्ठल मंदिर जवळ थांबलेले होते. त्यांना तेथे काहीच समजत नव्हते कारण त्यांच्याजवळ मोबाईलही नव्हता व संपर्कासाठी कुठलाही कागद नव्हता त्यामुळे ते बेचैन झाले. यावेळी त्यांना त्या परिसरातील रहिवासी असलेले पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी योगेश पाटील व त्यांचे भाऊ वाल्मीक पाटील यांनी त्यांना विचारपूस केली असता त्यांना काही सांगता येत नव्हते यावेळेस योगेश पाटील यांच्यातील पोलीस जागा झाला व त्यांनी लागलीच आपल्या पद्धतीने सगळीकडे फोन लावून माहिती घेतली असता त्यांना कळले की बाबा बाळद येथील असून ते घरातून निघून गेले आहे. योगेश पाटील व वाल्मीक पाटील यांनी लागलीच बाळद येथे संपर्क साधून त्यांच्या मुलाला बोलवून त्यांच्या स्वाधीन केले. तसेच यावेळी पोलीस कर्मचारी योगेश पाटील यांनी त्यांचे घरचे येण्यापर्यंत बाबांना घरी नेऊन जेवण दिले व त्यांना नवीन चपलांचा जोड घेऊन त्यांना त्यांच्या मुलाच्या स्वाधीन केले. यावेळी बाबांचा मुलगा संदीप पंडित सोमवंशी यांनी योगेश पाटील पोलीस कर्मचारी व वाल्मीक पाटील यांचे आभार मानले योगेश पाटील यांनी आपले पोलिसातील असलेले कर्तव्य जागृत ठेवून पोलिसातही माणुसकी असते हे दाखवून दिले आपले वडील आपल्याला सुखरूप मिळाले याबद्दल संदीप सोमवंशी यांनी योगेश पाटील व वाल्मीक पाटील यांचे आभार मानले.



