
जळगाव येथे बांधकाम कामगार महासंघ. जिल्हा कार्यकारणी मिटिंग संपन्न.नवीन पदाधीका-यांची नियुक्ती !
भारतीय मजदूर संघ जिल्हा अध्यक्ष किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम कामगार जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. मीटिंगसाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेशाध्यक्ष सदाशिव सोनार हे होते. व सर्व निर्वाचित पदाधिकारी .नव नियुक्त अध्यक्ष- प्रवीण शार्दुल उपाध्यक्ष गोपाळ शार्दुल व उपाध्यक्ष प्रवीण शिरसाठ , उपाध्यक्ष भास्कर मिस्त्री ,उपाध्यक्ष संजय वाघ सचिव-सुनील कोळी उप सचिव संतोष दांडेकर , भगवान वाघ , राजेंद्र महाजन , संजय शिरसाठ , लक्ष्मण अंबादास , दीपक खैरनार , संजय खैरनार , गोपाल वाघ कार्यकारी सदस्य आदी उपस्थित होते.
सर्व पदाधिकाऱ्यांना प्रदेश उपाध्यक्ष सदाशिव सोनार यांनी मार्गदर्शन केले. तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची एकमेकांची ओळख करून देण्यात आली. येणाऱ्या काळात जास्तीत जास्त सभासद कसे वाढतील संघटन कसं बळकट होईल याच्यावर चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी तालुका कार्यकारणी लवकरात लवकर जाहीर करा असेही आवाहन करण्यात आले. अध्यक्षांच्या विनंतीने सभा संपन्न करण्यात आली . तसेच सतत तिन मिटिंगाना गैरहजर राहणा-या पादाधीका-र्याना कार्य कारणीतून कमी करण्यात येईल असा निर्णय हि घेण्यात आला.



