अन्यखान्देश

भडगाव पाचोरा गिरणा नदी पात्रातुन सर्रास अवैध वाळू चा उपसा सहकार मंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली!

भडगाव गिरणा नदी पात्रातुन सर्रास अवैध वाळू चा उपसा सहकार मंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली!

भडगाव- प्रतिनिधि -(संजय शेवाळे/योगेश पाटील) -भडगाव गिरणा नदी पात्रातुन सर्रास अवैध वाळू चा उपसा सहकार मंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली ! भडगाव शहरातील गिरणा नदी पात्रातुन दिवसा ठवळ्या अवैध रित्या न कोनाला घाबरता वाळूचे टैक्टर जोमात चालु आहे. मात्र शासन ने घर पोच वाळु देऊ असा जी आर काडलेला होता ते मात्र फक्त कागदावर दिसुन येत आहे. यामुळे घरपोच ६०० रुपयात वाळू चे स्वप्न आता तरी दिवा स्वप्न दिसत आहे.   सहकार मंत्री सांगतात की जर अवैध रित्या आठळ्यास त्या विभागाचे महसुल अधिकारीसह टैक्टर मालक चालक यांच्या वर गुन्हा दाखल होईल मात्र असे काहीच दिसत नाही. ज्या कोणावर कारवाई केली जाती ती फक्त नावालाच केली जाते . रात्री बेरात्री अधिकारी रजेवर अथवा सुटीवर असल्यावर शनिवार रवीवार पाहून संधी साहू पणा केला जातो. असा प्रकार भडगाव सह पाचोरा येथे हि पहावयास मिळत आहे . पाचोरा येथे काही दिवासापूर्वी पोलीस लाईन मधून ३ ट्रक्टर अंदाजे ९:३० ते १० वाजेच्या सुमारास बाहेर काढण्यात आले तर , शनिवारी रोजी देखील पाचोरा तहसील आवारातून २ ट्रक्टर बाहेर निघाले. ह्या बाहेर निघणा-या वाहनांचा पंचानामा करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला होता का? केला असेल तर अधिकारी अशी माहिती पत्रकारांना का देत नाही . त्यांना कितीचे चलन दिले हे का जाहीर करत नाही. हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने चालते. सह्या तरी महसूल मध्ये आंधळ दळत आणि ….. पीठ खात असे चालल असे सर्व सामन्य नागराकांची प्रतिक्रिया येत आहे . विशेष म्हणजे प्रांत अधिकारी यांच्या बदली झाली याचा हि काही कर्मचारी फायदा घेत आहे असे दिसते . यावरूनच जनमानसात अशा भावना निर्माण होतात कि  हे सरकार दोन नंबर वाल्यांच्या पाठीसी आहे कि काय? कारण अवैध वाळू वाहतुकीमुळे सर्वसामन्यांची झोप उडते . तर अवैध धंदेवाल्यांची चांदी होते तर     सर्व सामान्य माणसाची पिळवणूक व वनवन होते. असे  जनतेतुन बोलले जात आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button