खान्देश

सुवर्णकार सराफ असोसिएशनच्या बैठकीत पोलीस निरीक्षक यांनी केल्या सोनार बांधवाना सुचना !

पाचोरा पोलीस स्टेशन ला अहिर सुवर्णकार सराफ असोसिएशनच्या बैठकीत सूचना व मार्गदर्शन करताना पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  राहुल खताळ
पाचोरा, (प्रतिनिधी) –   पाचोरा तालुक्यासह शहरातील सराफ असोसिएशनची बैठक घेऊन पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ  यांनी  आज रोजी पाचोरा स्टेशन येथे घेतली प्रसंगी  माहिती देताना काही मार्गदर्शक सुचना केल्या कि , व्यापारी बांधवांनी आपापल्या दुकानात सोन्या-चांदीचे मालाची काळजी घेणे तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बाहेरील बाजू व मधील बाजू लावून आपल्या दुकानाची होणारी चोरी टाळण्यासाठी कॅमेरे बसवणे आवश्यक आहे . तसेच दुकानात अनोळखी व्यक्ती आल्यास त्यावर व्यवस्थित लक्ष ठेवून आपल्या मौल्यवान वस्तू चोरल्या जाणार नाही.  याची काळजी घेणे तसेच आपल्या सोन्या चांदीचे मौल्यवान वस्तू याची सुरक्षिता ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळेस सर्व वस्तू व्यवस्थित ठेवणे तसेच आपल्या परिसरात एखादा गुरखा लावून रात्रीची सुरक्षिता करता त्याची नेमणूक करणे खेड्यावरून येताना आपल्या जवळच्या वस्तूची काळजी घेणे रात्री दुकान बंद करताना कुलूप व्यवस्थित लावणे चोरीचा माल कोणी आल्यास ताबडतोब पोलीस स्टेशनला कळविणे रात्रीची पेट्रोलिंग साठी येणाऱ्या पोलिसांना सहकार्य करणे संशयित व्यक्ती वाटल्यास पोलीस स्टेशनला कळवावे तसेच कुणीही चोरीचा माल किंवा संशयित व्यक्ती कडून सोने चांदी मोड घेवू नये , अशा अनेक सूचना सोनार समाज सराफ असोशियन यांना दिले. यावेळी सोनार समाजातील ज्येष्ठ सदस्य व सराफ असोसिएशनचे अध्यक्ष नाना देवरे, विष्णू महादू सोनार, कमलाकर जडे, जगदीश बापू सोनार, राजू बाविस्कर, शशिकांत सोनार, सुनील सराफ, सुनील सोनार, राजू सोनार,  संजय जडे,  नंदकुमार सोनार,  वसंत आबा सराफ,  राजू सोनार,  दीपक सोनार,  मनोज सोनार,  किरण देवरे,  कमलेश जडे,  बंटी सोनार,  रविंद्र सोनार,  कैलास सोनार,  पप्पू सोनार,  नितीन सोनार, मोहन सोनार,  कमलेश सोनार,  अमोल घाडगे,  हरीश देवरे, विजय सोनार,  जीवन जैन,  कांतीलाल शेठ जैन,  राजू घोडके,  बाबा जडे,  प्रमोद जडे,  योगेश जडे,  प्रकाश जैन,  सुधीर शुक्ला,  सोनू घाटी,  गजानन सोनार,  गोपाल सोनार,  नरहर सोनार,  राजेश संघवी,  अनिल सोनार,  रवींद्र सोनार,  हेमंत सोनार,  कमलेश सोनार,  राजेंद्र बाळदकर इत्यादी सोनार बांधव  उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button