आळंदी येथे झालेल्या पोलिसांकडून वारक-यांणवर लाठी चार्ज चा निषेधार्थ निवेदन !

आळंदी येथे झालेल्या पोलिसांकडून वारक-यांणवर लाठी चार्ज चा निषेधार्थ निवेदन !
पाचोरा- श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी बांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठी मार अत्यंत संताप जनक आहे. वारकरी संप्रदाय तसेच वारकरी बांधवांना संरक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. भागवत धर्माची पताका घेऊन चालणाऱ्या आणि अत्यंत भक्ती मार्गाने आचरण करणाऱ्या संपूर्ण वारकरी संप्रदायाचा हा मोठा अपमान आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या धडाडीच्या नेत्या सौ. वैशाली सुर्यवंशी यांनी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी श्री.विक्रम बादल यांना निवेदन दिले.
याप्रसंगी शेतकरीसेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख उद्धवभाऊ मराठे, तालुक़ाप्रमुख शरदपाटील,श्री.दादाभाऊ चौधरी (शिवसेना शहर समन्वयक), अरुण तांबे (मा.पं.समिती सभापति), कैलास मिस्तरी (मा.शहर प्रमुख शिवसेना), युवासेना उपजिल्हाप्रमुख संदीप जैन, युवासेना तालुक़ा प्रमुख भुपेश सोमवंशी, युवासेना शहर प्रमुख हरीश देवरे,युवासेना शहर संघटक प्रशांत सोनार, गौरव पाटील, संदीप पाटील आनंदभाऊ संघवी, पपुदादा राजपूत, ग़फ़्फ़ारभाई, मिथुनभाऊ वाघ, पपु जाधव, अभिषेक खंडेलवाल, विकास पाटील, संजय चौधरी, खंडू सोनवने, अतुल चौधरी, विलास पाटील आदि सर्व शिवसैनिक शिवसेना-युवासेना पाचोरा आदि उपस्थित होते.



