सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर यांची क्षत्रिय ग्रुपच्य ऑफिस ला सदिच्छा भेट”

सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर यांची क्षत्रिय ग्रुपच्य ऑफिस ला सदिच्छा भेट”
पाचोरा – महाराष्ट्रातील नर्मदा बचाव संघटनेच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्ते असलेल्या मेघा पाटकर यांनी नुकतीच पाचोरा येथे सामाजिक क्षेत्रात कार्यसर असलेले क्षत्रिय ग्रुप यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट व त्यांच्याशी हितगुज करून विविध विषयावर चर्चा केली व त्यांना पुढील वाटचालीस व क्षत्रिय ग्रुप यांना कुठलेही मार्गदर्शक व केव्हाही सहकार्य लागल्यास सहकार्य करण्याची ग्वाही दिली . मेघाताई पाटकर या महाराष्ट्रातील महिलांच्या व इतर कुठल्याही समस्यावर आवाज उठवण्यासाठी तत्पर असतात . त्यांनी महाराष्ट्रात अनेक विविध समस्या सोडविले असून त्यांना महाराष्ट्रातील एक खरोखर सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे स्वतःचा कुठलीही स्वार्थाने बाळगता फक्त जनसेवा हीच ईश्वर सेवा हा त्यांचा संकल्प व निर्धार आहे . त्यासाठी ते महाराष्ट्रातील नव्हे देशातील विविध भागात फिरून समस्याची माहिती घेत असतात. त्यावर उपाय योजना करण्यासाठी सहकार्य व मार्गदर्शन करीत असतात. काल त्या गो.से. हायस्कूल येथे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या . त्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते तथा अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष व क्षत्रिय ग्रुप संचालक धनराज पाटील , क्षत्रिय ग्रुप चे संचालक पप्पू राजपूत यांच्या भडगाव रोड वरील कार्यालयास सदिच्छा भेट दिली .
व क्षत्रिय ग्रुप व मराठा समाज सेवा प्रतिष्ठाण ला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पप्पू राजपूत, बंडु मोरे, मंगेश सोमवंशी, काशिनाथ गोसावी , बबलू मोरे, प्रशांत ठाकरे, आकाश खैरनार , रवी जाधव, भरत बडगुजर , मयूर पाटील,धनराज पाटील , खालीलदादा देशमुख , प्रवीण ब्रम्हाने , विशाल पाटील , अंकुश कटारे , जय वाघ यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रामाणात उपस्थित होते .



