शिंदे गटाला नको असलेले पाचो-याचे शिंदे ठरणार सत्ता स्थापनेचे किंगमेकर..?

शिंदे गटाला नको असलेले पाचो-याचे शिंदे ठरणार मार्केट कमिटीत सत्ता स्थापनेचे किंगमेकर..?
पाचोरा (योगेश पाटील)- महाराष्ट्रात भाजप आणि एकनाथ शिंदे यांची बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांची युती आहे तरीही पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे पदाधिकारी अमोल शिंदे यांनी प्रस्तापित आमदारांविरोधात भाजप पुरस्कृत वेगळे राहून आपले उमेदवार उभे केले अमोल शिंदेनी भाजप आणि बाळासाहेब ठाकरे गटाच्या सेनेच्या आमदार किशोर पाटील यांच्या पॅनलला आव्हान दिलं व आजी माजी आमदाररांवर शाब्दिक हल्ला चढवीत लबाड लांडग्यांची उपमा दिली होती . निकालामध्ये अमोल शिंदे यांच्या शेतकरी सहकार पॅनलचे २ उमेदवार निवडून आले प्रचारा दरम्यान आमदार किशोर पाटील यांनी अमोल शिंदेना आव्हान देत , आई व काकाला निवडून तर आण ! या भाषेत अमोल शिंदेनवर हल्ला चढवून कुत्रा बोलण्या पर्यंत जीभ घसरली . तर, दुसरीकडे किशोर पाटील यांचं पॅनल असो की महाविकास आघाडी पुरस्कृत , मा. आमदार दिलीप वाघ व वैशाली सूर्यवंशी यांचं पॅनल असो कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. मात्र अमोल शिंदे यांच्या विजयी दोन उमेदवारांच्या मतावर पाचोरा बाजार समितीवर कुठल्यातरी एका पॅनलची सत्ता स्थापन होणार आहे . तर बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षासोबत बंडखोरी करणारे भाजपचे पुरस्कृत अमोल शिंदे हे आता किंगमेकर ठरू पहात आहेत.
पाचोरा बाजार समिती येथे बाळासाहेब ठाकरे सेना गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनल, ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वाघ , प्रदीप पवार , सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे महाविकास पॅनल तर तर भाजपचे नेते अमोल शिंदे यांचे भाजप पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनल अशी तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली.
प्रचारच्या रणधुमाळीत एकमेकांवर आरोप करणारे लांडगे कुत्रे म्हणणारे आता मात्र सत्ता स्थापनेसाठी एकत्र येण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत असल्याची चर्चा सध्या रंगू लागली असली तरी विधान सभेच्या अनुशंघाने अशी युती झाल्यास ती अमोल शिंदे यांना घातक ठरणार असल्याचेही चित्र स्पष्ट दिसत आहे .विशेष म्हणजे स्वर्गीय मा.आ. आर.ओ पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी ह्या देखील आपल्या वडिलांचे स्वप्न पुर्ती कडे वाटचाल करण्यासाठी साम दाम दंड भेद वापरून महाविकास आघाडीच्या बरोबर राहून मार्केट कमिटीची सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एकीकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी एका मताकरीता दिव्य करावे लागणार आहे . तर मा आमदार दिलीप वाघ व वैशाली सूर्यवंशी यांच्या महाविकास आघाडीला तीन निवडून आणलेले संचालक लागणार आहे यामुळे सत्ता संघर्षाचा हा पेच सोडविण्यासाठी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत अमोल शिंदेंच्या दोन जागेमुळे ते जरी किंग मेकर ठरत असले तरी ते पक्ष आदेश पाळत आमदार किशोर पाटील यांना साथ देतात कि स्वयंभूच राहून विरोधात बसतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे .
मा.आमदार दिलीप वाघ यांना नविन संधी:-
या सर्व घडामोडीत माञ दिलीप वाघ यांना 60 – 40 चां डाग मिटविण्याचा व जिल्हा परीषद, नगरपालिका, पंचायत समिती, व येणा-या विधानसभेच्या अनुषंगाने स्वयंभु सत्ता स्थापन करण्याचा किंवा विरोधात राहून म्हणजे सत्ताधारी आमदारांबरोबर सत्ता स्थापन न करता 60 – 40 गणित जन मांनसाच्या मनातून काढण्याची हीच एक मेव संधी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
या सर्व घाडामोडीत मात्र सत्ता कोणाचीही आली तरी देखील सत्तेचा दुरुपयोग करून नेत्यांच्याच म्हणण्याप्रमाणे कुणीही मार्केट कमिटीचे लचके तोडले जावू नये किंवा तोडू नये अशी जनमानसात भावना निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया हि मिळत आहेत.



