खान्देशजळगांव जिल्हा
पाचोरा येथील श्री शिवमहापुराण निमित्त महिलांनी काढलेल्या यात्रेचे पावसाच्या आगमनाने स्वागत !

पाचोरा येथील श्री शिवमहापुराण निमित्त महिलांनी काढलेल्या यात्रेचे पावसाच्या आगमनाने स्वागत !
पाचोरा (प्रतिनिधी) – येथील श्री शिवमहापुराण निमित्त महिलांनी काढलेल्या यात्रेचे पावसाच्या आगमनाने स्वागत !
पाचोरा येथील कैलामाता देवी मंदिर च्या बाजूला असलेले सावा मैदान येथे श्री शिव पुराण महा कथा आयोजित केलेली असून ३० एप्रिल ते ०६ मे पर्यंत पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांचे शिष्य पंडित संजयजी शर्मा यांचे महापुराण कथा आयोजित केली आहे. त्यानिमित्त पाचोरा शहरातील सर्वधर्मीय महिला यांनी एकत्रित येऊन भव्य अशी कलश यात्रा कोंडवाडा गल्लीतील पांचाळेश्वर मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली . याप्रसंगी साक्षात श्री शंकर भगवान यांनी फक्त दहा मिनिटा करता पावसाने सुरुवात करून त्यांचे स्वागत केलेअसा प्रत्यत आला . महिलांनीही पावसात डोक्यावर कळस शोभायात्रेचा आनंद घेतला . संपूर्ण शहरात दहा मिनिटांसाठी पावसाचे आगमन झाले असता संपूर्ण रस्ते स्वच्छ झाले व त्या रस्त्यावरून श्री शिव महापुराण कथा या जागेवर जाण्यासाठी महिलांनी डोक्यावर कळस घेऊन जामनेर रोड मार्ग राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, भुयारी मार्ग ,भडगाव रोड येथून सावा मैदान पर्यंत कळस यात्रेची सांगता झाली . यावेळी कलश धारी महिलांचे स्वागत ठीक ठिकाणी करण्यात आले. प्रसंगी शहरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावून कळस यात्रेतील महिलांचे व महाराजांचे मनोभावे जंगी स्वागत केले . पाचोरा शहरात पहिल्यांदाच शिवमहापुराण सारखा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमासाठी शहरातील सर्व नागरिक व महिला तसेच बालगोपाळ मंडळी यांनी या कथेचा लाभ घेन्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे कार्यक्रमाचे आयोजन आग्रवाल समाजातील कार्यकर्ते व नियोजन ग्रीन ॲपल व पत्रकार बांधवांनी केले आहे.



