सामाजिक

माहेश्वरी महिला मंडळातर्फे  शिव महापुराण कथेसाठी सुरक्षा कवच बनविण्याचा स्तुत्य उपक्रम !

माहेश्वरी महिला मंडळातर्फे  शिव महापुराण कथेसाठी सुरक्षा कवच बनविण्याचा स्तुत्य उपक्रम !

पाचोरा (प्रतिनिधी ) पाचोरा- माहेश्वरी महिला मंडळातर्फे  शिव महापुराण कथेसाठी सुरक्षा कवच बनविण्याचा स्तुत्य उपक्रम ! दरवर्षी माहेश्वरी महिला मंडळ तर्फे त्यांच्या संतांची पालखी काढून भव्य मिरवणूकीचे आयोजन केले जाते . याप्रसंगी मंदिरामध्ये रांगोळीची सजावट विविध धार्मिक कार्यक्रम साठी लागणारे साहित्य आणून पूजा सेवा करीत असतात .माहेश्वरी महिला मंडळ या पाचोरा शहरातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमांमध्ये तसेच नवरात्र उत्सवामध्ये देवीमातेचे  चे जागरण करून पूजा पाठ करून विधी करीत असतात. विविध धर्माच्या संताच्या मिरवणुकांमध्ये सामील होऊन आपला सहभाग नोंदवतात ,  पाचोरा येथे होत असलेल्या श्री शिव महापुराण कथा आयोजन ठिकाणी माहेश्वरी महिला मंडळातर्फे भक्तांसाठी सुरक्षा कवच स्वतः महिला तयार करत असून त्यांनी धार्मिक कामासाठी आपला हातभार लावत आहेत . समाजातील सर्वच महिलांना श्री महापुराण कथा ऐकण्यासाठी यावे यासाकरीता आवाहन करीत आहेत . प्रसंगी  यावेळी माहेश्वरी महिला मंडळाचे अध्यक्षा मंगला बाहेती ,उपाध्यक्षा सुरेखा बंग, कोषाध्यक्षा  वंदना काबरा, सल्लागार लीला तोतला, लीला राखी ,शोभा कपडे, सुनिता लाहोटी ,पाचोरा शहर अध्यक्षा  प्रिया लाहोटी , सचिव अंजली न्याती, उपाध्यक्षा जया राठी , सहसचिव उषा बाहेती या सर्व कार्यकारणी सदस्य व समाजातील महिला उपस्थित होत्या

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button