चिकलठाणा घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवा.

चिकलठाणा घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवा.समाज बांधवांची मागणी- जामनेर तहसीलदार यांना दिवेदन !
भडगाव _प्रतिनीधी-(संजय शेवाळे)-चिकलठाणा घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवा…
चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 2 एप्रिल रोजी 30 वर्षीय महिलेवर झालेल्या सामूहिक पाशवी बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ तहसीलदार जामनेर यांना सकल बहुभाषिक चर्मकार समाजाच्या तर्फे निवेदन देण्यात आले.
मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेने महाराष्ट्रसह देशातील चर्मकार बांधव व बहुजन समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे. बहुजन समाजाच्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आलेला आहे. पीडित परिवाराला न्याय मिळावा, म्हणून पुढील मागण्यांचे निवेदन जामनेर तहसीलदार यांना देण्यात आले.
सदर खटला हा जलद गती न्यायालयात दाखल करून आरोपींना फाशीची शिक्षा ठोठवण्यात यावी..निर्भया फंडातून पीडित परिवाराला तत्काळ 25 लाख रुपयांची मदत मिळावी.. शासनाने पीडित परिवाराचे पुनर्वसन करावे… पीडित परिवारातील मुला मुलींच्या शिक्षणाची सर्वस्व जबाबदारी शासनाने घ्यावी… परिवारातील एका सदस्याला शासनाने शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे… सदर खटल्यासाठी उत्कृष्ट विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी.. महाराष्ट्रातील ज्या गावांमध्ये अनुसूचित जातींची मोजकीच घरे आहेत अशा ठिकाणी समाजावर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे, म्हणून अशा कुटुंबांना संरक्षण मिळवून देण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावी.
निवेदन दिल्यानंतर पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी तालुक्यातील शेकडो समाज बांधवांसोबत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.यामध्ये चंद्रसिंग लोडते, दीपक तायडे, अशोक भारुडे, बाबुराव हिवराळे, भारत रेसवाळ, राजू लोडते, दीपक रिछवाळ, हर्षल पवार, प्रकाश धनवाळ, संजय लोडते,सिताराम आगारे, साहेबराव पद्मे, विठ्ठल सावकारे, रामचंद्र वानखेडे, भिकन आगारे, मनोज शेवाळे, रवी जोनवाळ, गणेश आगारे,स्वानंद सुरळकर, दिलीप वानखेडे, सुभाष वाढे,शांताराम सुरळकर,वाल्मीक बिजोटे, खंडू गांगे, धोंडू गायकवाड, बाबूलाल लोडते, लालचंद भीमरोट, मनोज भिमरोट, योगेश मिमरोट, शक्ती मीमरोट, राजू जयसिंग लोडते, सुनील कासोटे, राजू आगारे, रवींद्र धनवाळ, शंकर मोची, बाबूलाल शेवाळे, लालचंद डवरे, गौरीबाई लोड, पूनाबाई भीमरोट, कौसाबाई भीमरोट, मंगला गांगे, मनीषा रिछवाळ, रेखाबाई रिछवाल, संगीताबाई रिछवाल, कमलाबाई रिछवाल, लक्ष्मीबाई रेसवाल, रेखा रेसवाल, धोंडाबाई आगारे, मंगलाबाई गांगे, अंकिता रेसवाळ, ज्योती लोडते,यांच्यासह असंख्य समाज बांधव,भगिणी उपस्थित होते.



