जेवण करण्यास गेलेल्या दोन तरुणांवर गोळीबार, दोघेही गंभीर जखमी, हल्लेखोर पसार जळगाव जिल्ह्यातील घटना

जेवण करण्यास गेलेल्या दोन तरुणांवर गोळीबार, दोघेही गंभीर जखमी, हल्लेखोर पसार जळगाव जिल्ह्यातील घटना
जळगाव (प्रतिनिधी)- भुसावळ येथे रात्रीच्या सुमारास दोन तरुणांवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील साकरी फाट्याजवळील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या एका शेताजवळ शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास हा गोळीबार झाला. यात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना डोक्याला आणि पोटाला गोळी जळगांव जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास दोन तरुणांवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील साकरी फाट्याजवळील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या एका शेताजवळ शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास हा गोळीबार झाला. यात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना डोक्याला आणि पोटाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळतेय.
शेताजवळ झाला गोळीबार
मंगेश आणि अक्षय आदी दुचाकीने जेवण करण्यासाठी निघाले होते. साकरी फाट्याजवळील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या एका शेताजवळ दोन्ही तरुण आले असता, हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून दोन फैरी झाडल्या. यामध्ये दोन्ही तरुण जखमी झाले आहेत.
हल्लेखोर पसार
हल्लेखोर दुचाकीवरुन पसार झाल्यानंतर त्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरु आहे. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी गोळीबाराच्या घटनेनंतर गोदावरी रुग्णालयात धाव घेत जखमीची भेट घेत गोळीबार झालेल्या घटनास्थळाची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.लागल्याची प्राथमिक माहिती आहे. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळतेय.
शेताजवळ गोळीबार :-
मंगेश आणि अक्षय आदी दुचाकीने जेवण करण्यासाठी निघाले होते. साकरी फाट्याजवळील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या एका शेताजवळ दोन्ही तरुण आले असता, हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून दोन फैरी झाडल्या. यामध्ये दोन्ही तरुण जखमी झाले आहेत.
हल्लेखोर पसार :-
हल्लेखोर दुचाकीवरुन पसार झाल्यानंतर त्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरु आहे. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी गोळीबाराच्या घटनेनंतर गोदावरी रुग्णालयात धाव घेत जखमीची भेट घेत गोळीबार झालेल्या घटनास्थळाची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.