हरिभाऊ पाटील यांची शासकीय कामात अडथळा या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता !

हरिभाऊ पाटील यांची शासकीय कामात अडथळा या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता !
पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बल्लाळेश्वर फौंडेशन चे अध्यक्ष हरिभाऊ तुकाराम पाटील यांचेवर शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून पूनगाव तलाठी गोपाळ लांजेवार यांनी 2017 मध्ये पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यातील सर्व कायदेशीर कामकाज पूर्ण झाल्यामुळे सदर गुन्ह्यातून हरिभाऊ तुकाराम पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली हरिभाऊ पाटील यांच्या तर्फे न्यायालयातील कामकाज ऍड.शिरुडे जळगांव तसेच ऍड.ललित एम. सुतार जळगांव (पाचोरा) यांनी शिरुडे तंतोतंत मार्गदर्शनानुसार व्यवस्थित मुद्देसूद मांडणी न्यायालयात मांडून व्यवस्थित कामकाज केल्यामुळे माझी (हरिभाऊ तुकाराम पाटील) यांची शासकीय कामात अडथळा या गुन्ह्यातून निर्दोष सुटका करण्यात आली. न्यालायाचे न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास होता . आणि आहे व राहील . सत्य परेशान होऊ शकते pan पराजित नाही . एवढेच मी यावेळी सांगू शकतो . असे हरिभाऊ पाटील यांनी . न्यूज झेप इंडियाशी बोलताना सांगितले . या गुन्ह्यासंदर्भात पाचोरा येथील सुप्रसिध्द ऍड.प्रल्हाद बी.पाटील (वाघुलखेडेकर) यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले त्याबद्दल ऍड.शिरुडे , ऍड,ललीत एम सुतार , ऍड.प्रल्हाद बी.पाटील यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. असे त्यांनी सांगितले व सर्वांचे आभार मानले .



