खान्देश

गोंडगाव येथे झालेल्या अमानुष हत्या व अत्याचाच्या निषेधार्थ गाळण येथे कॅण्डल मार्च !

गोंडगाव येथे झालेल्या अमानुष हत्या व अत्याचाच्या निषेधार्थ गाळण येथे कॅण्डल मार्च !

पाचोरा (प्रतिनिधी)- गोंडगाव ता. भडगाव येथे काही दिवसा पूर्वी स्वर्गीय कु.कल्याणी या अल्पवयीन बालिकेवरील झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्त्ये प्रकरणाच्या निषेधार्थ आणि अपराधी यास तात्काळ फाशी ची शिक्षा व्हावी त्याचा खटला फासत ट्रक कोर्टात चालावा  यासाठी गाळण बु!! ता.पाचोरा येथे ७/०८/२०२३ रोजी रात्री सर्व ग्रामस्थ,महिला, तरुण, तरुणी,लहान बालगोपालांच्या उपस्थितीत कँडल मार्च रॅली काढून निषेध नोंदवण्यात आला . तसेच दिनांक ८/८/२०२३ रोजी सकाळी वसंतराव नाईक आश्रम शाळेच, महाविद्यालय चे सर्व विद्यार्थी कर्मचारी वृंद, गाळण बु!!गाळण खु!!, विष्णू नगर, हनुमानवाडी च्या ग्रामस्थ, सर्व सरपंच,उप सरपंच, सदस्य, वि. सो. चेअरमन, संचालक, इ. च्या उपस्थितीत चारही गावातून संयुक्तिक मुक मोर्चा काढण्यात आला . प्रसंगी  सर्व उपस्थित जनसमुदाय व पदाधिकाऱ्यांनी एकमताने निर्णय घेतला की येणाऱ्या ऑगस्ट महिन्याच्या ग्रामसभेत ठराव संमत करावा की या बालिकेच्या अपराधीस त्वरित फाशी ची शिक्षा व्हावी जेणे करून पुढील काळात समाजात असे विकृत नराधम जन्माला येऊ नयेत व या आमच्या बहिणीला लवकर न्याय मिळावा यासाठी लोकप्रतिनिधी , जनता ,सरकार च्या माध्यमातून तसेच मा. न्यायालयात जलद गतीने चालावा याकरिता निवेदन देण्यात आले व मोर्चाची सांगत करण्यात आली .

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button