पाचोरा शहरातील काही प्रभागामध्ये घाणीचे साम्राज्य असे असतांना एका प्रभागाचे मा.नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने केली साफसफाई

पाचोरा शहरातील काही प्रभागामध्ये घाणीचे साम्राज्य असे असतांना एका प्रभागाचे मा.नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने केली साफसफाई !
पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा-नगरपालिका व आरोग्य विभाग घेत आहे कुंभकर्णी झोपेचे सोंग, पाचोरा शहरातील काही प्रभागामध्ये “पाचोरा नगरपालिका” ही दुर्लक्ष करीत आहे म्हणजेच कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत आहे, पाचोरा शहरात स्वच्छतेच्या नावाखाली लाखोचा मलिदा लाटला जात आहे . तर एककलमी कार्यक्रम राबविला जात आहे व अनेक ठिकाणी घाणणीचे साम्राज्य तयार झाले आहे . विशेष म्हणजे धनदांडग्या व उच्चभ्रू वस्तीतच साफ सफाई सध्यातरी होत आहे . अशी नाग्राकांचीच नव्हे तर खुद माजी नगर सेवक यांनीच न.पा प्रशासकिय अधिकारी यांच्यावर अप्रत्यक्ष स्वतः साफसफाई करून आदर्श घालून देत , प्रशासकाच्या मुस्काटीत दिल्या सारखे आहे . कारण कुठे-कुठे बारीक बारीक चाळीत रस्ते पुर्ण तर कुठे अपुर्ण रस्ते सोडुन दिलेली आहेत तसेच काही ठिकाणी म्हणजेच प्रभाग क्र ३मधील रेणुकामाता मंदीर शेजारी गटारीत घाणीचे साम्राज्य, रहिवासी नागरिक त्रस्त, पाचोरा शहरातील प्रसारमाध्यमे गृपवर आणि प्रत्येकाकडुन “पाचोरा न.पा.प्रशासना” ला वारंवार “प्र.क्र.3 चे कचरा व गटारी चे पाचोरा न पा सदस्य गृप वर गटारी चे फोटो व्हायरल होताहेत तरी ही टाकुन ही *”आरोग्य विभागा” तर्फे कुठली ही कारवाई, अथवा दखल घेतली गेली नाही म्हणुन पाचोरा प्रभाग क्रमांक ३ चे मा. नगरसेवक सतिष चेडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने ट्रॅक्टर भाड्या ने लावुन कचरा साफ केला कारण शरद ट्रेडींग कंपनी च्या गोडाऊनच्या मागील बाजुचा म्हणजे तेथे जि.प.ची प्राथमिक ,विद्यालय रेणुका माता देवस्थान आहे तेथे नागरीक लहान बालक शाळकरी मुलांचा सतत ये-जा आहे, त्यामुळे मा.नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज ही भुमिका घेत कचरा साफ केला,कारण वारंवार फोटो टाकुन ही “आरोग्य विभागा” तर्फे कुठली ही दखल घेतली गेली नाही.म्हणुन नगरपालिका पाचोरा प्रशासनाने तातडीने पाचोरा शहरातील समस्या ग्रस्त पाहणी करावी अशी संतप्त चर्चा होत आहे



