खान्देश

अखेर सत्याचाच विजय! धनराज पाटील यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता; अॅड. सत्यजित पाटील यांच्या युक्तिवादाला यश

अखेर सत्याचाच विजय! धनराज पाटील यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता; अॅड. सत्यजित पाटील यांच्या युक्तिवादाला यश

जळगाव | योगेश पाटील

पाचोरा नगरपालिकेतील तत्कालीन मुख्याधिकारी यांनी दाखल केलेल्या बहुचर्चित फौजदारी प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय, जळगाव यांनी महत्त्वपूर्ण निकाल देत धनराज नारायण पाटील यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, पाचोरा यांनी दिलेला दोषसिद्धीचा निर्णय रद्दबातल ठरवत अपील न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिला.

या प्रकरणात न्यायालयाने संपूर्ण पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांचे पुनर्मूल्यांकन केले. आरोपीविरुद्ध पाठलाग (Stalking), घरात घुसखोरी तसेच इतर आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक ठोस आणि विश्वासार्ह पुरावे सरकारी पक्ष सादर करू शकला नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच स्वतंत्र साक्षीदारांनीही सरकारी पक्षाच्या बाजूने साक्ष दिली नसल्याने आरोप सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

या खटल्यात धनराज पाटील यांच्यातर्फे **ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सत्यजित पाटील** यांनी प्रभावी बाजू मांडली. कायदेशीर मुद्द्यांचा सखोल अभ्यास, पुराव्यांचे अचूक विश्लेषण आणि प्रभावी युक्तिवादाच्या जोरावर त्यांनी न्यायालयासमोर सत्याची बाजू भक्कमपणे मांडली. त्यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे धनराज पाटील यांना न्याय मिळाला, अशी भावना त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली.

निकालानंतर धनराज पाटील यांच्या मित्रपरिवारात आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. *”शेवटी सत्याचाच विजय झाला,”** अशा भावना व्यक्त करत त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला.

यावेळी धनराज पाटील यांनी या संपूर्ण न्याय प्रक्रियेदरम्यान प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे साथ देणाऱ्या सर्व मित्र, हितचिंतक, कुटुंबीय, सहकारी तसेच कायदेशीर लढ्यात मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सत्यजित पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, हा निकाल केवळ वैयक्तिक विजय नसून सत्य आणि न्यायाच्या विजयाचे प्रतीक आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button