खान्देश

पाचोरा तालुकास्तरीय निपुण आढावा सभेत सर्वांगीण गुणवत्ता विकास कार्यक्रमाचा शुभारंभ

पाचोरा तालुकास्तरीय निपुण आढावा सभेत सर्वांगीण गुणवत्ता विकास कार्यक्रमाचा शुभारंभ!
मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी दिल्या शुभेच्छा
पाचोरा -येथील महालपुरे मंगल कार्यालयात जिल्हा परिषद शिक्षकांची तालुकास्तरीय आढावा सभा नुकतीच घेण्यात आली. सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, डायट प्राचार्य डॉ अनिल झोपे, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, अधिव्याख्याता डॉ चंद्रकांत साळुंखे, गट विकास अधिकारी सुधाकर मुंढे, गटशिक्षणाधिकारी विजय पवार,शा पो आ अधीक्षक सरोज गायकवाड, समाधान पाटील यांचे सह सर्व केंद्र प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पाचोरा तालुक्यातील सर्व शाळांसाठी सर्वांगीण गुणवत्ता विकास कार्यक्रम 2026-27 ची अंमलबजावणी करण्याचा संकल्प करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी निपुण भारत अभियान चा आढावा घेऊन 100% विद्यार्थी निपुण करण्याच्या सक्त सूचना दिल्या. कामकाज समाधानकारक नसलेल्या शिक्षकांना प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागेल अशी तंबीही त्यांनी दिली. डायट प्राचार्य डॉ अनिल झोपे पी जी आय इंडिकेटर व राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण बाबत सखोल मार्गदर्शन केले. डॉ चंद्रकांत साळुंखे यांनी गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी कार्यवाही करण्याची सूचना दिली. प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी शिक्षकांना शाळेत वेळेवर येणे, विद्यार्थी सुरक्षितता बाबत काळजी घेणे, गुणवत्तेबाबत तडजोड केली जाणार नाही असे सांगितले. सूत्रसंचालन अभिजित खैरनार सर यांनी केले. प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांनी केले. आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख जितेंद्र पाटील यांनी केले.विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया यामध्ये येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना याबाबत सभेत चर्चा करण्यात आली.सुमारे पाचशे शिक्षक सभेला उपस्थित होते. सभेच्या यशस्वीतेसाठी सर्व केंद्र प्रमुख, बी आर सी कर्मचारी, विशेष शिक्षक यांनी परिश्रम घेतले.पाचोरा शिक्षण विभागाच्या नियोजित सर्वांगीण गुणवत्ता विकास कार्यक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले.या नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती पुढील प्रमाणे
सर्वांगीण गुणवत्ता विकास कार्यक्रम २०२६-२७

🔹बौद्धिक विकास-

निपुण महाराष्ट्र अभियान
इ. २ री ते इ. ५ वी च्या विद्यार्थ्यांना
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करून देणे.

मिशन स्कॉलरशिप-
इ. ४ थी. आणि इ. ७ वी च्या विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करणे व २ सराव परीक्षा घेणे.

मिशन नवोदय –
इ. ५ वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे व २ सराव परीक्षा घेणे.

🔹शारीरिक विकास-
दर शनिवारी साप्ताहिक सामुहिक कवायत उपक्रम घेणे.

🔹भावनिक / नैतिक मानसिक विकास –
आदर्श परिपाठाच्या माध्यमातून भावनिक विकास व मानवी मूल्यांचा आदर करण्याची क्षमता अंगी बाणणे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button