धुळ्यात ‘M FM’ चॅम्पियन ऑफ ग्रोथ पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न; नाशिकचे सुधीर अहिरे व मीनाक्षी अहिरे सन्मानित!

धुळ्यात ‘M FM’ चॅम्पियन ऑफ ग्रोथ पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न; नाशिकचे सुधीर अहिरे व मीनाक्षी अहिरे सन्मानित !
भडगाव प्रतिनिधी:- व्यावसायिक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करत स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकट करणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्यासाठी ‘MY FM’ रेडिओ आणि ‘दैनिक भास्कर’ समूहाच्या वतीने आयोजित ‘चॅम्पियन ऑफ GROWTH’ पुरस्कार सोहळा धुळे येथील हॉटेल आनंद रीजन्सीच्या हॉलमध्ये अत्यंत उत्साहात पार पडला. या भव्य कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यशस्वी उद्योजकांना मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी बोलताना MY FM चे ग्रुप हेड अतुल पाटील व असिस्टंट मॅनेजर प्रसाद भामरे यांनी सांगितले की, “स्थानिक पातळीवर व्यवसाय वाढवून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारे उद्योजक हेच आपल्या अर्थव्यवस्थेचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांची हीच प्रगती (ग्रोथ) अधोरेखित करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दैनिक भास्कर समूह नेहमीच कटिबद्ध आहे.”
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते गौरव
या सोहळ्यात नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक श्री. सुधीर अहिरे आणि त्यांच्या पत्नी सौ. मीनाक्षी अहिरे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते ‘चॅम्पियन ऑफ ग्रोथ’ पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर अहिरे दांपत्यासह सर्वच विजेत्यांनी दैनिक भास्कर आणि MY FM च्या या कौतुकास्पद उपक्रमाचे आभार मानले. या सोहळ्यासाठी परिसरातील अनेक मान्यवर, व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुधीर अहिरे व सौ. मीनाक्षी अहिरे यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
———————-प्रतिक्रिया ——————
“धुळे शहराच्या विकासात आणि सौंदर्यात भर घालणारे दर्जेदार प्रकल्प उभारण्याचा आमचा संकल्प यापुढेही कायम राहील. या पुरस्कारामुळे नवीन उद्योजकांना कठीण परिस्थितीतही उत्तम काम करण्याची प्रेरणा मिळेल.”
— सुधीर अहिरे (पुरस्कार विजेते)



