खान्देश

पाचोरा येथे अवैध धंद्यांना उत राजकारण्यांच्या निवेदनाला केराची टोपली !

पाचोरा येथे अवैध धंद्यांना उत राजकारण्यांच्या निवेदनाला केराची टोपली !

पाचोरा (संपादक- योगेश पाटील)  पाचोरा सह परिसरात अवैध धंद्यांना उत आले असून राजकीय मंडळी मात्र निवेदने देवून शांत बसली आहेत. निवेदने दिल्या नंतर किती दिवस अवैध धंदे बंद झाली. त्या नंतर पूर्वरत का झाले. याचा मात्र सर्व सामन्यांना प्रश्न पडला. राजकारणी दबले कि अधिकार्यांपुढे नतमस्तक झाले. पुढे काय झाले हे सर्व सामान्यांना पडलेले गहन कोडे आहे. आज पाचोरा सारख्या शांततामय शहरात केव्हा अशांतता नांदायला लागेल अशी जनमाणसात भीती निर्माण होत आहे. नुकतीच पाचोरा पोलिसांनी चोरीच्या मोटार सायकली पकडून अतिशय अभीनंदनीय कामगिरी केली त्यामुळे सर्व स्थरातून पोलिसांचे कौतुकही झाले. परंतु पाचोरा येथील युवक व्यसनाधीन होताना दिसत असून चौका चौकात अवैध धंद्यांचा वास येत आहे.चक्री मुळे चक्रम होणारे युवक तर काही ठिकाणी कॉफी शॉप च्या नावे चालणारे गोरख धंदे तर रात्रीच्या काळोखात अनेक कोप्लेक्स मध्ये चालणारे अश्लील धंदे यास कोणाचा वरदहस्त आहे. हे सर्व बंद झाल्यास पोलिसांची मानही उंचावणार आहे यात मात्र शंखा नाही . पुरवठा विभागात चाललेला सावळा गोंधळ ग्रामीण भागातील जनतेची होत असलेली वाताहात. रस्त्यावरील बेशिस्त अतिक्रमण अनेक टप-यांवर मिळणा-या नशा युक्त कि मुक्त सुगंधी गोळ्या ,मुखवास च्या नावाने मिळणारा गुटखा , हे सहजच कुठेहि मिळेल अशी ठिकाणे पाचोरा शहरासाठी सन्मानाचे आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे पोलीस , महसुल प्रशासनाचे लक्ष जात नाही का?  शेवटी एकच पाचोरा विकास कितीही झाला तरी शहरातील व परिसारातील तरुण पिढीला वाचविणे व त्याचा विकास होणे महत्वाचे. वेळीच प्रशासनाने या गोष्ठीचे गांभीर्य पाहून संबधितांवर योग्य ती कारवाई करावी.  हि सर्व सामान्य जनतेची अपेक्षा . तृर्तास क्रमशः

संपादक :- योगेश पाटील निकम -९७६७२११०००

बी.ए.डी.एड, एम.ए.एम.सी.जे,एल.एल.बी (App)

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button