पारोळा तालुक्यातील मंगरूळ गावात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेसह विविध संस्थेत उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न !.
पारोळा (प्रतिनिधी – कैलास पाटील ) तालुक्यातील मंगरूळ गावात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेसह विविध संस्थेत उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न !.
ग्रामपंचायतीमध्ये माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण
मंगरूळ येथील ग्रामपंचायतीमध्ये माजी सैनिक रावसाहेब श्रीराम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच रुपाली दिलीप पाटील, उपसरपंच प्रतिभा भाऊसाहेब पाटील, ग्रामसेवक नितल पाटील, पोलीस पाटील प्रल्हाद पाटील, तसेच पंडित चुडामन पाटील, दिलीप पाटील, के.वाय. पाटील, योगेश पाटील आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.
शाळांमध्येही स्वातंत्र्यदिन साजरा
जिल्हा परिषद शाळेत शिक्षण समितीचे सदस्य ज्ञानेश्वर देविदास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी मुख्याध्यापक वसंत पाटील, सर्व शिक्षक-शिक्षिका आणि गावातील नागरिक उपस्थित होते.
त्याचप्रमाणे महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयामध्ये चेअरमन भरत सोनू पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटिकेने उपस्थितांचे मन जिंकले.
गुणवंतांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा
कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये, दहावीत 99% गुण मिळवणाऱ्या आकाश ज्ञानेश्वर पाटील याचा विशेष सत्कार संस्थेचे अध्यक्ष भरत सोनू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक व्ही.एम. पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना, “जे विद्यार्थी आपल्या शाळेतून घडतात, त्यांचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थ्यांनीही प्रगती करावी,” असे आवाहन केले. शाळेचे सदस्य सचिव दीपक पाटील यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.



