खान्देश

पाचोर्‍यात स्वातंत्र्यदिनानिमित्त भाजपाच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन

पाचोर्‍यात स्वातंत्र्यदिनानिमित्त भाजपाच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन*

—————————————————————

*14 ऑगस्ट रोजी शहरांतील तमाम देशप्रेमी जनतेला सहभागी होण्याचे केले आवाहन*

पाचोरा-  भारतीय जनता पार्टी पाचोरा च्या वतीने पाचोरा शहरात दिनांक 14 ऑगस्ट 2025 गुरुवार रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून पाचोरा शहरातील सर्व राजकीय,सामाजिक,शैक्षणिक, व्यावसायिक,व इतर संस्था आणि संघटना,शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच तमाम देशप्रेमी रहिवासी नागरिकांना यावेळी सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त ऑपरेशन सिन्दूर हे आपल्या देशाच्या इतिहासातील अभिमानाचं पान आहे.आपल्या शूर जवानांनी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तिरंग्याचा मान उंचावण्यासाठी प्राण पणाला लावून हे मिशन यशस्वी केलं.या विजयाचा अभिमान आणि आपल्या वीर जवानांच्या त्यागाचा सन्मान म्हणून, 14 ऑगस्ट गुरुवार रोजी पाचोरा शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन केल्याचे भारतीय जनता पार्टीचे शहर मंडळाचे वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

तरी पाचोरा शहरातील सर्वांनी सर्व राजकीय,सामाजिक,शैक्षणिक, व्यावसायिक,व इतर संस्था आणि संघटना,शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच तमाम देशप्रेमी रहिवासी नागरिकांना मोठ्या संख्येने या तिरंगा रॅलीला उपस्थिती राहण्याचे राहून आपल्या देशाच्या सैन्याच्या अभिमान वाढवावा ही विनंती भाजपा पाचोरा मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. सदर तिरंगा रॅली ही १४ ऑगस्ट, गुरुवार रोजी सकाळी ८:०० वाजता एस.एस.एम.एम.कॉलेज, कॉलेज पासुन सुरू होणार असून रॅलीचा मार्ग खालील प्रमाणे असेल.

तिरंगा रॅलीचा मार्ग:- 📍एस.एस.एम.एम.कॉलेज – 📍छत्रपती संभाजी महाराज चौक – 📍अटल भाजपा कार्यालय पाचोरा – 📍हुतात्मा स्मारक छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे समारोप-

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button