धुळे जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याला राज्यस्तरीय “आदर्श शेतकरी पुरस्कार”

धुळे जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याला राज्यस्तरीय “आदर्श शेतकरी पुरस्कार”
खलाणे | प्रतिनिधी
धुळे, नंदुरबार व जळगाव या तीन जिल्ह्यांतून आयोजित ॲग्रोवर्ड कृषी प्रदर्शन अंतर्गत देण्यात येणारा राज्यस्तरीय “आदर्श शेतकरी पुरस्कार” खलाणे (ता. …) येथील युवा प्रगतशील शेतकरी मनोहर धनराज पाटील उर्फ एम. डी. पाटील यांना प्रदान करण्यात आला.
नंदुरबार जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नयनजी गोयल यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विशेष म्हणजे, धुळे जिल्ह्यातून एकमेव शेतकरी म्हणून श्री. मनोहर पाटील यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या गौरवाबद्दल परिसरातील शेतकरी बांधवांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्री. पाटील यांनी आपल्या शेतामध्ये पपई, बोरे, आवळा, ॲपल बोर, पेरू, शेवगा आदी विविध फळबागांचे आधुनिक व यशस्वी प्रयोग राबवून शेतीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत ॲग्रीसर्च इंडिया लिमिटेडचे एरिया मॅनेजर महेश पाटील, पराग गणू, विभागीय अधिकारी नारायण विसावे, तसेच निर्मलचे सीईओ विजय राठोड यांनी वेळोवेळी शेताची पाहणी करून मार्गदर्शन केले आहे.
शेती क्षेत्रातील नावीन्यपूर्ण प्रयोग व सातत्यपूर्ण यशामुळे धुळे जिल्ह्यातून राज्यस्तरीय पुरस्कारासाठी त्यांची शिफारस करण्यात आली. या प्रसंगी मनोहर पाटील व सौ. निर्मला पाटील यांचा संयुक्तपणे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या गौरवाबद्दल खलाणे ग्रामस्थ, शेतकरी मित्र व परिसरातील नागरिकांकडून पाटील दाम्पत्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.



