खान्देश

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे सन्मानित पत्रकारांचा गौरव सोहळा

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे सन्मानित पत्रकारांचा गौरव सोहळा

६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त तांदुळवाडीत शालेय किट वाटप

तांदुळवाडी (ता. भडगाव)
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन (६ जानेवारी) निमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवार, दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता तांदुळवाडी येथील कै. यादव दगडू पाटील माध्यमिक विद्यालयात सन्मानित पत्रकारांचा गौरव व शालेय किट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोरभाऊ रायसाकडाविभागीय उपाध्यक्ष राकेश सुतार यांच्या आदेशानुसार, संघाचे तालुकाध्यक्ष रतिलाल पाटील गोंडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही वस्तीगृहातील अनाथ व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय किट वाटप करण्यात येणार आहे. पाचोरा व भडगाव तालुक्यातील सन्मानित व्यक्तींच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमासाठी तालुका हल्लाकृती समितीचे अध्यक्ष पत्रकार प्रल्हाद पवार, उत्तर विभागीय उपाध्यक्ष मनीष सोनवणे तसेच ज्येष्ठ पत्रकार अशोक बापू परदेशी यांनी विशेष प्रयत्न केले असून, ग्रामीण भागात गेल्या दहा वर्षांच्या कालखंडातील हा पहिलाच भव्य उपक्रम ठरणार आहे.

या कार्यक्रमास पाचोरा व भडगाव परिसरातील सर्व सन्मानित पत्रकारांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button