पाचोरा तालुक्यात माध्यमिक डी.एड. शिक्षक महासंघाच्या बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद – तालुका कार्यकारिणी जाहीर, पदोन्नती संदर्भात सविस्तर मार्गदर्शन**

**पाचोरा तालुक्यात माध्यमिक डी.एड. शिक्षक महासंघाच्या बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद — तालुका कार्यकारिणी जाहीर, पदोन्नती संदर्भात सविस्तर मार्गदर्शन**
**जळगाव प्रतिनिधी :**
महाराष्ट्र माध्यमिक डी.एड. शिक्षक महासंघ, जळगाव जिल्ह्याच्यावतीने पाचोरा येथे आयोजित बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीस पाचोरा तालुक्यातील माध्यमिक डी.एड. शिक्षक बांधव व भगिनींचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला.
बैठकीदरम्यान २४ मार्च २०२३ च्या राजपत्रातील तरतुदी, २८ जानेवारी २०२५ चा शासन निर्णय (जी.आर.) आणि सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी संदर्भातील निर्णयाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शिक्षकांच्या पदोन्नती संदर्भातील विविध मुद्यांवर चर्चा करून संघटनेच्या आगामी धोरणांबाबत निर्णय घेण्यात आला.
🔹 **पाचोरा तालुका कार्यकारिणी जाहीर :**
* **यशोदीप समाधान पाटील** — तालुकाध्यक्ष
* **अरविंद अर्जुन पाटील** — कार्याध्यक्ष
* **रोहित नाना पाटील** — उपाध्यक्ष
* **रवींद्र अर्जुन आव्हाड** — उपाध्यक्ष
* **रविराज विश्वनाथ सोनवणे** — सचिव
* **नितीन बिजयसिंह राजपूत** — सहसचिव
* **प्रकाश यशवंत मोरे** — सहसचिव
* **सय्यद शरीफ सय्यद युसुफ** — सदस्य
* **सय्यद तोफिक सय्यद खलील अहमद** — उर्दू प्रतिनिधी
या बैठकीला जिल्हाध्यक्ष **श्री. तुळशीराम सोनवणे (जळगाव)**, जिल्हा सचिव **सौ. सुनीता मिलिंद खडके (जळगाव)**, विभागीय सचिव **श्री. भास्करराव बागल (चाळीसगाव)**, जिल्हा पूर्व विभाग कार्याध्यक्ष **डी. एस. पाटील**, उर्दू विभाग प्रमुख **नदीम शेख**, तसेच **पांडुरंग पवार** उपस्थित होते.
शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून एकजुटीने लढा देण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.



