खान्देश

मणियार विधी महाविद्यालय येथे “पीएम-उषा” एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

मणियार विधी महाविद्यालय येथे “पीएम-उषा” एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

जळगाव, 26 सप्टेंबर – खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या एस. एस. मणियार विधी महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “पीएम – उषा” सॉफ्ट घटकांतर्गत “मुला-मुलींचे समुपदेशन” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेची सुरुवात सकाळी 9.30 वाजता दीपप्रज्वलनाने झाली. अध्यक्षस्थानी के.सी.ई. संस्थेच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे होते. उद्घाटन समारंभाला सह दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग श्री. एम. व्ही. चव्हाण, आय.एम.आर. महाविद्यालयाचे डॉ. पराग नारखेडे, मणियार विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, तसेच कार्यक्रम संयोजक प्रा. जी. व्ही. धुमाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी डॉ. रेखा पाहूजा, डॉ. योगेश महाजन, डॉ. विजेता सिंग, डॉ. अंजली बोंदर, प्रा. शरद चव्हाण, प्रा. अमिता वराडे, प्रा. बी. एस. पाटील, डॉ. ज्योती भोळे, प्रा. स्वाती लोखंडे, प्रा. नितीन मतकरी, डॉ. साहेबराव पडलवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ. साहेबराव पडलवार (नूतन मराठा महाविद्यालय) यांनी करिअर मार्गदर्शन केले. योग्य करिअर निवड व त्यासाठी आवश्यक कौशल्यांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्रात श्रीमती दर्शना पवार (लैंगिक समानता प्रशिक्षक) यांनी विवाहपूर्व समुपदेशन या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी पारंपरिक दृष्टिकोन टाळून समानता, स्वातंत्र्य आणि विश्वास या मूल्यांवर आधारित दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले.

तिसऱ्या सत्रात डॉ. माधुरी कासाट (डॉक्टर्स असोसिएशन अध्यक्षा) यांनी मानसिक स्वास्थ्य व वैयक्तिक स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करत, मानसिक आरोग्य हे सुखी जीवनाचे मूळ असल्याचे अधोरेखित केले.

चौथ्या सत्रात डॉ. कांचन नारखेडे (जिल्हा मानसिक स्वास्थ्य कार्यक्रम अधिकारी) यांनी विद्यार्थ्यांमधील मनोविकार या विषयावर सखोल विवेचन करत, सकारात्मक विचार, नियमित व्यायाम आणि श्वासोच्छ्वासावर नियंत्रण याचे महत्त्व सांगितले.

कार्यशाळेच्या समारोप समारंभाला के.सी.ई. सोसायटीचे सचिव ॲड. प्रमोद पाटील उपस्थित होते. त्यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल कौतुक करत सर्वांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुस्कान पिंजारी व अक्षय गागडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. जी. व्ही. धुमाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ईशा पिंपळीकर, साक्षी शुक्ला, ईश्वर मांडोळे, विधी जोशी, राहुल तेली, सागर गवई, सागर बाविस्कर, निलेश भोई, कमलेश सोनवणे, वैष्णवी पाटील या विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

या कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील सुमारे 250 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यशाळेचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांकडून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, समुपदेशनासंदर्भातील उपयुक्त माहितीमुळे त्यांचे आत्मभान व आत्मविश्वास वाढीस लागल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button