अतिवृष्टीचा कहर : पाचोरा-भडगाव तालुक्यात पूरस्थिती, प्रशासन सतर्क

अतिवृष्टीचा कहर : पाचोरा-भडगाव तालुक्यात पूरस्थिती, प्रशासन सतर्क
पाचोरा:-काल मध्यरात्री व सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाचोरा-भडगाव तालुक्यातील नद्यांना पूर आला आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरले. पाचोऱ्याच्या हिवरा नदीच्या तुफानी पुरामुळे भैरम नगर, हनुमाननगर, त्र्यंबकनगर, नदी काठावरील अन्य भागा जवळील घरांत मोठ्या प्रमाणावर पाणी घुसले. तर खडकदेवळा, तारखेडा, लोहटार, अंतुर्ली व भडगाव या गावांमध्येही पुराच्या पाण्याने घरगुती साहित्य व मालमत्तेचे नुकसान झाले.
या गंभीर पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे जलसंपदा तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. गिरीशभाऊ महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी श्री. आयुष्य प्रसाद, प्रांताधिकारी श्री. भूषण अहिरे,पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार श्री. दिलीपभाऊ वाघ, भाजपा नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, श्री. अमोलभाऊ शिंदे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी मा. गिरीशभाऊ महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याचे आदेश दिले तसेच पुढील कार्यवाहीबाबत स्पष्ट सूचना केल्या. प्रशासन पूर्णपणे सतर्क असून पुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.



