खान्देश

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे पोलीस निरीक्षक भडगाव यांना निवेदन सादर

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे पोलीस निरीक्षक भडगाव यांना निवेदन सादर

भडगाव – नुकत्याच त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाद्वारे दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्यावर होणारे हल्ले हे गंभीर असून अशा प्रकारांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे तसेच पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात आणि त्या हल्लेखोरांना अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी ठाम भूमिका व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने पोलीस निरीक्षक भडगाव यांच्याकडे मांडली.

यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले, जिल्हा संपर्कप्रमुख विठ्ठल मराठे, जिल्हा सहसंघटक संजय महाजन, तालुकाध्यक्ष अशोक परदेशी, शहराध्यक्ष संजीव शेवाळे, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, शहर सरचिटणीस शिवदास महाजन, तालुका संघटक अमीन पिंजारी, शहर कार्याध्यक्ष गणेश अहिरे, तालुका सरचिटणीस नरेंद्र भोसले, व्हॉईस ऑफ मीडियाचे आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button