पाचोरात शिवसेना (शिंदे गट) च्या भगव्या लाटेचा जल्लोष – नगराध्यक्ष सौ. सुनीता किशोर पाटील व नगरसेवक सुमित किशोर पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ

कैलादेवी मातेच्या आशीर्वादाने प्रचाराची दमदार सुरुवात!
पाचोरात शिवसेना (शिंदे गट) च्या भगव्या लाटेचा जल्लोष – नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनीता किशोर पाटील व नगरसेवक पदाचे उमेदवार सुमित किशोर पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ
पाचोरा (प्रतिनिधी) –
आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) तर्फे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीता किशोर पाटील तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार सुमित किशोर पाटील यांनी आज केलादेवी मातेच्या दर्शनाने आपल्या प्रचाराची भव्य आणि उत्साहवर्धक सुरुवात केली.
या शुभारंभ कार्यक्रमाला आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाची नवी लाट निर्माण झाली.
केलादेवी मंदिरात नारळ फोडून व साष्टांग नमस्कार करून देवीचे आशीर्वाद घेतल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, जयघोषात आणि भगव्या पताकांच्या फडक्यात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, घोषणांनी वातावरण दणाणून सोडले आणि “शिवसेना जिंदाबाद” च्या घोषणांनी पाचोरा भगवामय झाला.
या कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट), युवा सेना, महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साह आणि ऐक्याचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम पाचोराच्या राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण करणारा ठरला.
सौ. सुनीता किशोर पाटील या पाचोराच्या माजी नगराध्यक्षा असून त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. “विकास आणि जनसेवा हाच आमचा मुख्य अजेंडा असेल,” असा निर्धार त्यांनी शुभारंभी व्यक्त केला.
या दमदार सुरुवातीने शिवसेना (शिंदे गट) च्या प्रचाराला जोम मिळाला असून, आगामी निवडणुकीत भगव्या झेंड्याखाली नवा उत्सव साजरा होण्याची चाहूल दिसत आहे.



