चोरट्यांनी सुरक्षा रक्षकास चाकुचा धाक दाखवत 4,18000 हजाराचा ऐवज केला लंपास; पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल.

चोरट्यांनी सुरक्षा रक्षकास चाकुचा धाक दाखवत 4,18000 हजाराचा ऐवज केला लंपास; पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल.
पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा येथील मोढाळे रोड येथील कृषक धान्य व्यापार नावाचे व ऑईल मिल बाजोरीया ऑईल रीफायनरी येथील सुरक्षा रक्षकास चाकूचा धाक दाखवत चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,आज दि.23/07/2023 रोजी पहाटे 03:30 सुमारास पाचोरा मोंढाळे रस्त्यावरील कृषक धान्य व्यापार व ऑईल मिल बाजोरीयाऑईल रीफायनरी येथील सुरक्षा रक्षकास चाकू चा धाक दाखवून फॅक्टरीच्या ऑफिस मध्ये प्रवेश करुन 4,18000 हजाराचा ऐवज अज्ञात तीन इसमानी चोरुन नेला या बाबत आशिष जगदिश बाजोरिया यांनी पाचोरा पोलिसात फिर्याद दिली असून चोरीस गेलेला मालात i)405000/-रूपये रोख त्यात सर्व 500 दराच्या रूपयेच्या नोटा. ii)5,000/-रूपये किंमतीचे गोदरेज कंपनीची तिजोरी जु.वा.कि.अ. iii)1000/-रूपये किंमतीचे सोनेरी रंगाची बिस्किटे पेपर वेट म्हणून वापराचे जु.वा.कि.अ. iv)6000/-रूपये डि.व्ही.आर.मशीन जु.वा.किं.अ.5)1000/-रूपये किंमतीचा मोबाईल कंपनी माहीत नाही (सुरक्षा रक्षकाचा मोबाईल)असा एकुण 4,18000 रूपयाचा ऐवज लंपास केला.अज्ञात चोरट्या विरुद्ध भा.द.वी.कलम 394,458,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहे.



