खान्देश

होमिओपॅथिक डॉक्टर्सची जुनी मागणी मान्य; पाचोर्‍यात आमदार किशोर पाटील यांचा सत्कार

होमिओपॅथिक डॉक्टर्सची जुनी मागणी मान्य; पाचोर्‍यात आमदार किशोर पाटील यांचा सत्कार

पाचोरा (प्रतिनिधी):  गेल्या १० वर्षांपासून प्रलंबित असलेली होमिओपॅथिक डॉक्टर्सची महत्त्वाची मागणी शासनाने अखेर मान्य केली आहे. सी.सी.एम.पी. कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टर्सचे **महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन करण्यावरील स्थगिती उठवून पुन्हा प्रक्रिया सुरू करण्याचा शासन आदेश** नुकताच जारी करण्यात आला आहे.

या ऐतिहासिक निर्णयानिमित्ताने पाचोरा व भडगाव तालुका होमिओपॅथिक असोसिएशनतर्फे आमदार किशोर पाटील यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले. या वेळी तालुक्यातील होमिओपॅथिक डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्कार समारंभात उपस्थित डॉक्टर्स 
डॉ. दीपक पाटील, डॉ. नंदकिशोर पिंगळे, डॉ. भरत पाटील, डॉ. प्रमोद सोनवणे, डॉ. राहुल झेरवाल, डॉ. अभिषेक पाटील, डॉ. दीपक चौधरी, डॉ. राहुल तेली, डॉ. वीरपाल देशमुख यांच्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यातील बी.एच.एम.एस. डॉक्टर्सनी आमदार किशोर पाटील यांचे आभार मानले.

होमिओपॅथिक क्षेत्राला नवा न्याय 
या निर्णयामुळे होमिओपॅथिक डॉक्टर्सना नवसंजीवनी मिळाली असून वैद्यकीय क्षेत्रात त्यांच्या हक्काचा न्याय अखेर मिळाल्याची भावना क्त होत आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button