खान्देश

सहकार नेते प्रतापनाना पाटील व कन्या पुनम पाटील यांचा भाजपा प्रवेश !

सहकार नेते प्रतापनाना पाटील व कन्या पुनम पाटील यांचा भाजपा प्रवेश

पाचोरा- भडगाव विधानसभेतील शिक्षण क्षेत्रासह, सहकारातील ज्येष्ठ नेते प्रताप नाना पाटील व त्यांच्या कन्या जिल्हा दूध संघाच्या संचालिका तसेच पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ पूनम पाटील यांनी राज्याचे मंत्री गिरीशभाऊ महाजन,आमदार मंगेशदादा चव्हाण,भाजपा नेते अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करून आपल्या राजकीय आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. प्रताप नाना पाटील यांचा पाचोरा- भडगाव मतदार संघात असलेला लोक संपर्क बघता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला याचा नक्कीच फायदा होईल त्यात शंका नाही. माजी आमदार दिलीप वाघ, ठाकरे गटातील वैशाली सूर्यवंशी आणि आता प्रताप पाटील यांचा प्रवेश करून भारतीय जनता पार्टीने पाचोरा- भडगाव विधानसभेत मोठी ताकद तसेच आवाहन विरोधकांना निर्माण केले आहे. पाचोरा- भडगाव तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता पक्ष वाढीसाठी आखलेली रणनीती यशस्वी होताना दिसत आहे.
तरी आगामी काळात देखील मतदारसंघातील काही मोठे चेहरे भारतीय जनता पार्टीत येण्याची शक्यता असल्याचे चर्चिली जात आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या प्रवेशा प्रसंगी आमदार मंगेश दादा चव्हाण, दिलीप भाऊ वाघ,अमोलभाऊ शिंदे,रोहित निकम,भैरवी पलांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button