जळगांव जिल्हा

एकनाथ खडसेंच्या नेतृत्वावाखाली राष्ट्रवादी प्रणीत पॅनलचा दणदणीत विजय !

बोदवड (प्रतिनिधी) – बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज लागला असून यात राष्ट्रवादी प्रणीत पॅनलने दणदणीत विजय संपादन केल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांना धक्का बसला आहे.

बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यासह भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव परिसराचा समावेश असल्याने तीन तालुक्यांची एकमेव बाजार समिती म्हणून या मार्केट कमिटीचा नाव लौकीक आहे.

अर्थात, यामुळेच  ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जात होती. गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून आमदार एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून बाजार समिती ही भाजपकडे होती. आता ते राष्ट्रवादीत असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे स्वतंत्र पॅनल उभे केले. या पॅनलला पहिल्यांदा महाविकास आघाडी पॅनल म्हणून हि संबोधण्यात आले असले तरी कॉंग्रेसच्या उमेदवारांना यात स्थान मिळाले नाही. याचमुळे अर्ज माघारीच्या वेळेस कॉंग्रेसचे नेते विरेंद्र पाटील आणि डॉ. जगदीश पाटील यांनी आमदार एकनाथराव खडसे यांच्यावर जोरदार टिका केली होती.

परंतु दरम्यान, राष्ट्रवादीच्या पॅनलला शिवसेना व भाजपच्या पॅनलने तगडे आव्हान उभे केले होते. या मुळे आमदार एकनाथराव खडसे विरूध्द आमदार चंद्रकांत पाटील असा सामना देखील रंगला होता. निवडणुकीच्या काळात दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. या अनुषंगाने निवडणूक चुरशीची झाली.आज सकाळी दहा वाजता या निवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ झाला. यात दोन्ही पॅनलमध्ये चुरस निर्माण होईल अशी अपेक्षा होती. तथापि, असे झाले नाही. येथे राष्ट्रवादीच्या पॅनलने १८ पैकी तब्बल १७ जागा जिंकून दणदणीत विजय संपादन केला. तर महायुतीच्या पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. या विजयामुळे एकनाथराव खडसे यांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार चंद्रकांत पाटील यांना धक्का बसला आहे. या निवडणुकीत नाथाभाऊंच्या सोबतीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील व नेत्या रोहिणी खडसे तसेच सर्व सहकाऱ्यांनी तळमळीने काम केले. नाथाभाऊंच्या सहकारातील आधीच असलेल्या ताकदीला राष्ट्रवादीची जोड मिळाल्याने येथे राष्ट्रवादीच्या पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी प्रणीत पॅनलचा विजय दृष्टीपथात आल्याबरोबर समर्थकांनी जोरदार जल्लोष करत मोठ्या आनंदाने आनंदोत्सव साजरा केला.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button