खान्देश

कर्नाटक राज्यात कॉंग्रेस ची सत्ता : जल्लोष पाचो-यात!

कर्नाटक राज्यात कॉंग्रेस ची सत्ता :पाचोर्यात जल्लोष

पाचोरा (प्रतिनिधी) – कर्नाटक राज्यातील सत्तेत कॉंग्रेस ची निर्विवाद सत्ता बसल्याने पाचोरा कॉंग्रेस ने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी ढोल-ताशा फटाक्यानी जल्लोष करत पेढे वाटप करण्यात आले.

भाजपा ला कंटाळून महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी याच्या विरोधात कर्नाटक च्या जनतेने कॉंग्रेस ला एकहाती सत्ता देत लोकशाही ला माननारे राज्य असल्याचे सिद्ध केले आहे. या कॉंग्रेस च्या विजयाचा जल्लोष पाचोरा कॉंग्रेस ने केला आहे. यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला तर ढोल-ताशा वाजवुन पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंनद साजरा केला. तर शहरातील नागरिकांना पेढे वाटण्यात आले. यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, महीला जिल्हा प्रतिनिधी अॅड मनिषा पवार,शंकर सोनवणे, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, ओबीसी सेल सरचिटणीस, संदीप पाटील, अल्ताफ शेख, रहीम शेख, एसी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, प्रकाश भिवसणे, जलील शाह सुभान शाह, अक्रम शेख,अकलाख शेख, जुनेद खान, जावेद खान, आसिम मौलाना, परवेज खान आदि उपस्थितीत होते

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button